पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रभुषण चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘वोट चोरी’ विरोधात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाने वोट चोरी करून कशी सत्ता मिळविली याबद्दल जाहिरपणे पत्रकार परिषदेमध्ये मांडणी करून दाखविली. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मताधिकार. याच मताची चोरी मागील निवडणुकांमध्ये भाजपाने करून सत्तेची फळे चाखत आहे. देशभर या विरोधात जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर वोट चोर, गद्दी छोडचा नारा देत त्या विरूध्द स्वाक्षऱ्या मोहिम राबविण्यात येत आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील सर्व सामान्य नागरिकांचा दाबला जाणारा आवाज राष्ट्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचविण्याकरीता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘लोकशाहीने सर्वांना एकसमान मतदानाचा अधिकार दिला आहे. हा मताधिकार सर्व सामान्यांकडून हिसकावून सत्तेची हौस भागवून घेत भारतीय जनता पक्ष हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे. या मत चोरीचा तीव्र निषेध आम्ही जनतेचा आवाज बनून या स्वाक्षरी मोहिमेच्या द्वारे करीत आहोत.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, तानाजी निम्हण, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, सुंदर ओव्हाळ, ॲड. राजश्री अडसुळ, अनुसया गायकवाड, द. स. पोळेकर, राजेश मोहिते, अनिल पवार, अविनाश अडसुळ, रवि पाटोळे, ॲड. शाबीर खान, ॲड. निलेश बोराटे, विनय ढेरे, ऋषीकेश बालगुडे, सुनिल घाडगे, विल्सन चंदवेळ, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, अमित कांबळे, सद्दाम शेख, ॲड. नंदलाल धिवार, राकेश नामेकर, सुरेश चौधरी, वीराज सोंडकर आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते.

