होरोलॉजीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा
स्टेलार ३.० मध्ये प्रस्तुत केली तीन लिमिटेड–एडिशन घड्याळे – सेलेस्टीयल इन्स्पिरेशन, ऍडव्हान्स्ड होरोलॉजी आणि रेअर मटेरियल्स
राष्ट्रीय, ९ ऑक्टोबर, २०२५: टायटनने स्टेलार ३.० प्रस्तुत करून भारतातील घड्याळ बनवण्याच्या कलेमध्ये एक नवा अध्याय रचला आहे. टायटनने स्वतःच्या इन्फिनाईट या प्रमुख फेस्टिव कलेक्शनपासून प्रेरणा घेऊन स्टेलार ३.० तयार केले आहे. यातील ९ अतिशय अनोख्या घड्याळांपैकी ३ लिमिटेड एडिशन्स आहेत, ही तीनही घड्याळांचे वैशिष्ट्य म्हणजे वॉन्डरिंग अवर्स हा प्रकार भारतात पहिल्यांदा सादर केला जात आहे. या निमित्ताने टायटनने मुंबईतील बॅस्टियन ऍट द टॉप येथे एक विशेष लॉन्च शोकेसचे आयोजन केले होते.
स्टेलर ३.० ची कल्पना एका कॅनव्हास म्हणून करण्यात आली, असा कॅनव्हास ज्यावर अनेक खगोलीय चमत्कार आणि होरोलॉजिकल कल्पकता यांचा मिलाप होतो. द वॉन्डरिंग अवर्समध्ये हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यात आले आहे. चंद्र आणि प्रवास करणाऱ्या ताऱ्यांपासून, त्यांच्या खगोलीय मार्गांनी प्रेरित होऊन हे कलेक्शन बनवण्यात आले आहे. स्फटिकीकृत टायटॅनियम, तांब्याच्या बेझल, ट्विन सॅटेलाइट डिस्क, मिनिट ट्रॅकवर प्रमाणबद्ध फिरणे ही सर्व या घड्याळांची वैशिष्ट्ये आहेत. टायटनच्या इन-हाऊस मुव्हमेंट्स यामध्ये वापरण्यात आल्या आहेत, या लिमिटेड-एडिशनमध्ये फक्त ५०० घड्याळे बनवण्यात आली आहेत. किंमत ₹१,७९,९९५
आइस मेटियोराइट, स्टेलर १ आणि २ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर तेच यश पुन्हा संपादन करण्यासाठी शानदार पुनरागमन करत आहे. आता यामध्ये एक कॉस्मिक आइस-ब्लू डायल है, जी खऱ्याखुऱ्या १,२०,००० वर्षे जुन्या म्यूओनियोनालुस्टा उल्केवर प्लेट करण्यात आली आहे. गहन अंतरिक्षाचा इतिहास आणि आधुनिक डिझाईन यांची ही सांगड अप्रतिम आहे. याची किंमत ₹१,३९,९९५ आहे. ऑरोरा कैलमची किंमत ₹९५,९९५ आहे, चमकणारी हिरवी डायल नॉर्दन लाईट्सची आठवण करून देते आणि आपल्या सामंजस्यपूर्ण गतीने सूक्ष्म डिस्कला फ्रेम करते.
वॉचेस अँड वेयरेबल्सचे सीईओ, कुरुविल्ला मार्कोस यांनी सांगितले:
“टायटनने ४१ वर्षांपासून, सर्जनशीलता आणि कारीगरीच्या माध्यमातून भारतातील घड्याळ निर्मितीची व्याख्या रचली आहे. स्टेलार १.० ने डिझाईन विश्वात नव्या विषयांचा उदय घडवून आणला. स्टेलार २.० मध्ये अचूकता आणि बारकावे वाढवण्यात आले, आणि आता स्टेलार ३.० ने एका अज्ञात क्षेत्रात साहसी भरारी घेतली आहे. टायटनच्या इन-हाउस मूवमेंटचा वापर करून तयार करण्यात आलेले वॉन्डरिंग अवर्स एका निर्णायक क्षणाचे प्रतीक आहे, जे हे सिद्ध करते की आपण भारतीय घड्याळ निर्मितीला जागतिक पातळीवर मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत, जिथे नावीन्य, कलात्मकता आणि तंत्रज्ञान नैपुण्ये एक असाधारण अनुभव निर्माण करण्यासाठी एकत्र येतात. हा प्रारंभ आहे एका दूरवरच्या प्रवासाचा आणि आम्ही भारतीय घड्याळ निर्मितीला अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
स्टेलार ३.० कलेक्शनचे तीन रचनात्मक आधारस्तंभ आहेत: आकाशात घडणाऱ्या घटना, ज्यांच्यामध्ये ब्रह्मांडीय चक्रांची लय पकडलेली असते; उच्च दर्जाची घड्याळ निर्मिती, ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि कथाकथन यांचे सघन मिश्रण आहे आणि दुर्मिळ सामग्री, जी ब्रह्मांडातील तत्त्वांना वेयरेबल कलेमध्ये साकार करते. नऊ घड्याळांमध्ये, हे विचार कलेक्टर्स आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींना अनंताची एक झलक दाखवण्यासाठी एकत्र आणले गेले आहेत.
निवडक टाइटन स्टोर्स आणि www.titan.co.in वर स्टेलार ३.० कलेक्शन खरेदी करता येईल. महत्त्वाकांक्षी आणि घड्याळप्रेमींना ब्रह्मांडाची सैर करता येईल, हे कलेक्शन तुम्हाला जाणीव करून देईल की अनंत, आश्चर्यकारक ब्रह्मांड तुमच्या मनगटावर सामावले जाणे शक्य आहे.

