‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त
- सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
मराठी नाटक व सिनेमा आशयघन दर्जेदार; मराठी चित्रपटांना चांगले दिवस

मुंबई, दिनांक ७ ऑक्टोबर :- मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक निर्मिती पासून प्रदर्शना पर्यंत आवश्यक सुविधासह चित्रपट नगरीचा विकास असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात अभिनेते अभिनेते अक्षय कुमार यांनी त्यांचे मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासाबाबत प्रश्नांना उत्तर दिली.
चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप
मुख्यमंत्री म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मिती पासून प्रदर्शना पर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञान याचा मोठा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत , मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरण साठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत.
विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून केले जाईल. चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी सुविधा व कायापालट द्वारे चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप आयकॉनिक स्वरूप देण्यासाठी पाऊल टाकली जात आहेत.
दर्जेदार मराठी चित्रपट आणि नाटके अभिनव निर्मितीमुळे सक्षम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगाशीलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आत्ताचा दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी येथे चित्रपट मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंतच्या काळात असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्व सामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen – z) भावणारे व आवडणारे चित्रपट येण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील.
“डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राईम च्या रूपाने आव्हान उभे राहत आहेत. शासन अशा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणांच्या कामकाजात अमूलाग्र बदल घडवत आहे. गैरप्रकार नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहेत, या बदलाचा साक्षीदार होऊन अशा विषयांवर आधारित कथा आधारित सिनेमे निर्माण केले जावेत, यामधून या प्रयत्नांना बळ मिळेल. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड अशा बाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात "डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.
यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामे, पोलिस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देत, मुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल, मुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईल, असे सांगितले.
या प्रकट मुलाखत प्रसंगी ‘ फिक्की’ चे अनंत गोयंका,’ मेटा’ च्या संध्या देवनाथन, आशिष कुलकर्णी, अर्जुन लोहार , दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच चित्रपट, प्रसार आणि समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
00000

