पुणे, 30 सप्टेंबर 2025
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत पासपोर्ट सेवा केंद्र मुंढवा येथे ‘ओपन हाऊस’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सत्र बुधवार, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत पासपोर्ट सेवा केंद्र, झिरो वन, सर्व्हे नंबर ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्किड समोर, पुणे येथे होईल.
सत्रादरम्यान पासपोर्ट अर्जदार प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांना भेटून आपल्या पासपोर्ट अर्जासंदर्भातील शंकानिरसन अथवा तक्रारनिवारण करू शकतील.
ज्या अर्जदारांना पासपोर्ट सेवा केंद्र येथील ओपन हाऊसमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आगाऊ स्वरुपात rpo.pune@mea.gov.in या मेल आयडीवर खालील माहिती पाठवून द्यावी.
| फाइल क्रमांक | |
| नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) | |
| नाव | |
| प्रश्न थोडक्यात |
आपल्या मेलनंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे यांच्यामार्फत ओपन हाऊसमधील प्रवेशाच्या परवानगीसंदर्भातील पुष्टीकरण मेल आपणास पाठवण्यात येईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्र मध्ये प्रवेश दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तारीख – १ ऑक्टोबर २०२५ (बुधवार)
स्थळ – पासपोर्ट सेवा केंद्र, झिरो वन, सर्व्हे नंबर ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्किड समोर, पुणे
वेळ – दुपारी ३ ते ५.

