: भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम करण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम
मुंबई: जागतिक गुंतवणूकदार आणि उपाय अमलात आणण्यातील अग्रगण्य प्रदाता असलेल्या केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (“केफिन टेक्नॉलॉजीज”) आज “IGNITE” हा प्रमुख कार्यक्रम लाँच करण्याची घोषणा केली. म्युच्युअल फंड वितरक आणि संबंधित सेवा पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्ममधील संवादात परिवर्तनकारी बदल घडवणारा असा हा कार्यक्रम आहे. बँका, राष्ट्रीय वितरक, म्युच्युअल फंड वितरक (MFDs) आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIAs) अशा वितरक परिसंस्थांना समर्थन, डिजिटल साधने आणि सहयोगी समस्या-निराकरणासह सक्षम करण्यासाठी इग्नाइटची रचना केली गेली आहे. ज्यामुळे ते अधिक कार्यक्षमतेने, उत्तम प्रतिसाद देत विश्वासाने स्केल करण्यास सक्षम होतात.
भारताच्या वित्तीय बाजारपेठांना सक्षम करण्याचा तब्बल चार दशकांचा वारसा केफिनटेककडे आहे. याच पाठबळावर इग्नाइट कंपनीच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, आणि तो आहे वितरकांसाठी व्यवहार भागीदार ते परिवर्तन सहयोगी. या कार्यक्रमाचा उद्देश ग्राहक – कंपनी संबंध व्यवस्थापन आणि सेवा वितरणाची पुनर्परिभाषा करणे हा आहे. तसेच भारताच्या वाढत्या गुंतवणूकदार संख्येला सेवा देण्यासाठी एएमसी आणि वितरक कशी भागीदारी करतात यासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करणे यासाठी देखील हे कार्यरत आहे.
आधुनिक काळातील वितरकांच्या गरजांनुसार तयार केलेल्या सर्वसमावेशक ऑफर्स देणे हे इग्नाइटच्या केंद्रस्थानी आहे:
• समर्पित रिलेशनशिप मॅनेजर वितरकांच्या श्रेणींमधून सातत्यपूर्ण आणि वैयक्तिक समर्थन देतील
• सुधारित प्रतिसाद आणि समस्या निराकरण यंत्रणेसह जलद सेवा उपलब्ध होतील
• आर्थिक मध्यस्थांसाठी केफिनचे एकात्मिक सुपर ऍप केफिन केआरए, आयआरआयएस आणि सीमलेस ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्मसारखे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ऑपरेशन्स सुलभ करतील तसेच डिजिटल स्केल वाढवतील
• नियोजनबद्ध फीडबॅक चॅनेलद्वारे, वितरकांच्या गरजांनुसार केफिनटेक त्यांच्या ऑफर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
हा एकात्मिक दृष्टिकोन वितरकांना केवळ साधनांसह नव्हे तर विश्वासार्ह भागीदार परिसंस्थेसह सक्षम बनवतो – जो त्यांना कार्यक्षमता वाढवण्यास, गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यास आणि त्यांची पोहोच वाढविण्यास मदत करतो.
या लाँचबद्दल केफिन टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीकांत नाडेला म्हणाले, “वितरकांच्या समस्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या एखाद्या मंचाची खूप पूर्वीपासून आवश्यकता होती. यासाठीच IGNITE ही आमची वचनबद्धता आहे. केवळ ऑपरेशनल सपोर्टच नाही तर भागीदारांची मानसिकता लक्षात घेऊन, वेगाने विकसित होणाऱ्या, डिजिटली नेतृत्वाखालील गुंतवणूक क्षेत्रात भरभराट करण्यास आम्ही वितरकांना सक्षम करत आहोत. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर वितरणाचे भविष्य सह-निर्मित करण्यासाठी राबवलेला एक दीर्घकालीन प्रवास आहे.”
इग्नाइटची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाली आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. 2030 पर्यंत AUM 80 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल, असा अंदाज आहे. अर्थात या वाढीसोबत कमी खर्च, जलद डिजिटल अनुभव, वैयक्तिकृत ऑफरिंग आणि पारदर्शक सेवा अशा अपेक्षाही वाढतात. PwC च्या अलीकडील म्युच्युअल फंड्स 2030 च्या अहवालात, स्पर्धात्मकतेचा मार्ग ऑपरेशनल लेयर्समध्ये बदल आणि क्लायंट एंगेजमेंट सुधारण्यात असल्याचे म्हटले आहे. वितरकांना गुंतवणूकदारांच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम करून, खंडित सुधारणांद्वारे नव्हे तर एकात्मिक एंगेजमेंट मॉडेलद्वारे अचूकपणे परिवर्तन करण्यास इग्नाइट सक्षम करते.
तात्काळ कार्यक्षमता वाढण्याव्यतिरिक्त, IGNITE चा व्यापक भांडवली मार्केट इकोसिस्टीमवर मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे. चांगली सेवा देणारे वितरक हे चांगले गुंतवणूकदार घडवतात — विशेषतः उदयोन्मुख टियर 2 आणि टियर 3 मार्केटमध्ये. जिथे या सगळ्या आर्थिक बाबींमधील प्रवेश अजूनही तेवढा सुलभ नाही तसेच या व्यवहारांबाबतचा विश्वास अजूनही निर्माण होतो आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवून वितरकांना मजबूत करून केफिन टेक्नॉलॉजीजचे लक्ष्य गुंतवणूकदारांचा समावेश वाढवणे हे आहे. मार्केटची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून अधिक पारदर्शक आणि स्केलेबल वित्तीय प्रणालीमध्ये योगदान देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

