पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीला 65 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठे येथे आयोजित करण्यात आला आहे. इनामदार यांचा सत्कार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य’ या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
शनिवारी जयमाला काळे-इनामदार यांचा सत्कार व लावण्यांचे कविसंमेलन
Date:

