संयुक्त स्त्री संस्थेच्या शाळेचा उपक्रम …
पुणे – अडचणी आल्या तरी डगमगत नाहीत. संकटे आली तरी त्यांना ठामपणे सामोरे जातात त्याच खऱ्या उद्योजिका. कोणताही उद्योग करायचा तर त्यासाठी पैसे लागतातच पण पैसे असले म्हणजे तुम्ही यशस्वी उद्योजक व्हालच असे नाही. उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर पैसे म्हणजे भांडवल कमी असले तरी समाजात चांगल्या भावनेने काम किंवा उद्योग केला तर त्याला समाज चांगला प्रतिसाद देतो आणि यशस्वी करतो. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम, सातत्य, सकारात्मकता आणि साहस असणे आवश्यक आहे असे नवदुर्गांनी आज येथे सांगितले.
शारदीय नवरात्रोत्सवात आदीशक्तीचा जागर केला जातो. हे औचित्य साधून संयुक्त स्त्री संस्थेच्या वतीने समाजातील आदीशक्ती असलेल्या नवदुर्गा पूजनाचा कार्यक्रम आयोजत करण्यात येतो. या निमित्ताने नविन पिढीला समाजातातूल कर्तृत्वंवान महिलांची आणि आपल्या परंपरांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम गेली १४ वर्षे शाळेत करण्यात येत आहे.
यंदा समाजातील आत्मनिर्भर उद्योजिका श्रीमती रोहिणी नाईक (कागदी पिशव्या, फाईल्स), श्रीमती शीला बानावळकर टोकेकर (टेलरिंग), श्रीमती सुवर्णा मुसळे (वाती, कापसाची वस्त्र), श्रीमती कुंदा पायगुडे (मसाजिस्ट), श्रीमती स्वाती नरगुंदे (सर्व प्रकारची पिठाची गिरणी), श्रीमती स्वाती ओतारी (वज्रलेपन), श्रीमती छाया जगदाळे (रसवंतीगृह), श्रीमती सुनंदा आंधळे (पर्स), श्रीमती सुवर्णा पारखी (दिवाळी फराळ) यां नवदुर्गांचा शारदीय नवरात्राचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हळक कुंकू, अत्तर लावले, प्रसाद दिला. हातावर स्वस्तिक काढले. त्यानंतर त्यांना तांब्याचा कलश, त्यावर आंब्याच्या पानांवर श्रीफळ व त्यावर गरजा ठेवलेला मंगल कलश देऊन त्यांचे पूजन केले. अध्यक्षा नीता रजपूत, सचिव मधुरा जोगळेकर, साधना अबिके आणि त्यांच्या सहकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थानी नव दुर्गाना प्रश्न विचारून बोलते केले.
महिलाकडे अगभूत कौशल्य असते, गरज ते कौशल्य ओळखून त्यानुसार काम करण्याची असे नवदुर्गानी सांगितले. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांची, त्यांचा कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शारदीय नवरात्रात हा दुर्गा पूजनाचा उपक्रम गेली तेरा वर्षे संस्थेत सुरू आहे. पुण्यातील पानशेत पूराच्या आपत्तीत मदतीसाटी त्यावेळी पुण्यातील महिलांच्या 56 संस्था एकत्र आल्या होत्या. त्यांची संयुक्त स्त्री समिती स्थापन केली. त्यांनी मदत कार्यही केले. त्यानंतर ही समिती बरखास्त करू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व आयुक्त स. गो. बर्वे यांनी सांगितले. त्यातून संयुक्त स्त्री संस्थेची स्थापना 31 मे 1963 या दिवशी झाली. या संस्थेच्यावतीने गरीब मुलांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा चालवल्या जातात. त्यात 650 मुले शिक्षण घेत आहेत. याशिवाय पाच झोप़डपट्टयांमध्ये बालवाड्या चालवल्या जातात.
अध्यक्षा नीता रजपूत यांच्यासह उद्योजिका नवदुर्गांनी दीपप्रज्वलन केले. सामुहिक श्रीसूक्त पठणानंतर पाहुण्यांचा व नवदुर्गांचा परिचय करून देण्यात आला. अध्यक्षा नीता रजपूत यानी सांगितले की, समाजाचे चलनवलन चालवण्यासाठी नवदुर्गा हा महत्वाचा घटक आहे. आज एकत्र कुटुंब पध्दत गली. ती उणिव या नवदुर्गा भरून काढत आहेत. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या नव दुर्गांची आणि त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विद्यार्थीच्या हातून दुर्गाचे पूजन करण्यात येते. उपक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. या निमित्ताने महिला समाजात का काय काम करू शकतात ? त्यासाठी कशी मेहनत घेतात अन यश मिळवता याची महिती मुलांना मिळते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेनगुप्ता यांनी करून शेवटी अश्विनी माने यांनी आभार मानले.

