आज दिनांक 28/09/2025 रोजी *पुणे जिल्ह्यासाठी *रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत पुणे घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागरिकांनी सतर्क राहावे.मंत्रालय, मुंबई. वरील माहिती मौसम वेबसाईट वरून घेतलेली आहे.*
मुंबई: राज्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून राजधानी मुंबईतही जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याने आज पुन्हा एकदा मुंबई शहराला रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज साधारणतः आकाश ढगाळ राहील. तसंच जोरदार ते अतिजोरदार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पवासाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. नाशिक घाट परिसराला रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस रेड ॲलर्ट आहे. आज, रविवारी मात्र महामुंबईला रेड ॲलर्ट देण्यात आल्याने मुंबईकर धास्तावले असून, मेगा ब्लॉकच्या दिवशी पावसामुळे आणखी किती खोळंबा होतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. दक्षतेचे आवाहन करण्यात आले.मुंबईत शनिवारी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंतच्या १२ तासांमध्ये दिंडोशी येथे ३२.२, के पूर्व महापालिका विभाग कार्यालय येथे २४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये बेलापूर येथे ७२ मिलीमीटर, नेरुळ येथे ९१ मिलीमीटर, महापालिका मुख्यालय येथे ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

