Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेअर मार्केट ट्रेडिंग अ‍ॅपवर’श्रीमंत व्हा’ -20 ते 25 कोटींची फसवणूक :कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेलवर छापा-सांगलीच्या २ भामट्यांसह ७ जणांची टोळी पकडली

Date:

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

पुणे- शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणार्‍यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी धरपकड केली. तेव्हा ते सर्व जण चायनीज सायबर चोरट्यांसाठी येथील लोकांची बँक खाती उपलब्ध करुन देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यांनी १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सायबर पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

यश भारत पाटोळे (वय २५, रा. रमण मळा, कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (वय ३४, रा. निर्माण सेरेन, उंड्री), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरुद्दुन (वय ३०, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (वय २४, रा. घोरपडी पेठ, मोमीनपुरा), हुसेन ताहीर सोहेल शेख (वय २३, रा. मुजीब कॉलनी, संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (वय ४१, रा. निर्मल टाऊनशिप, काळेबराटेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फार्मा कंपनीत प्रोग्रामर असलेल्या तक्रारदार यांना फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये शेअर मार्केटमध्ये रोज १० ते २० टक्के नफा मिळेल, असे सांगितले जात होते. त्यांना कोटक क्युआयबी या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग अ‍ॅपवर ८९ लाख ३५ हजार रुपये गुंतवणुक करण्यासाठी सांगितले. फिर्यादीने गुंतवलेल्या रक्कमेवर ८ कोटी ७१ लाख रुपये नफा दाखविला. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सर्व्हिस टॅक्स भरायला सांगून फसवणुक केली होती.

या गुन्ह्यात आरोपींनी कॉसमॉस बँकेच्या खात्याचा वापर केला होता. त्यात ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले होते. पोलिसांनी या खात्याची माहिती घेतल्यावर ते ट्रेडिंग गुरु या नावाने यश पाटोळे चालवत होता. तांत्रिक विश्लेषणातून तो कोंढव्यातील हॉटेलमध्ये मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेल येथे त्याचे साथीदार एकत्र मिळून अकाऊंट चालवित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ओंकार प्राईड हॉटेलवर छापा टाकून ५ जणांना पकडले. ते टेलिग्रामवरुन चायनीज भाषा बोलणारे व्यक्तीच्या संपर्कात राहून सीसीटीव्ही कॅमेरे लावून अजित आनंदराव गायकवाड (रा. सांगली) व धनाजी नाथा पाटील (रा. सांगली) यांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे दोन बँक खाती चालवित असल्याचे मिळून आले. त्यांच्याकडून ९ मोबाईल, १५ सिमकार्ड, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, ८ चेक बुक, २० एटीएम/डेबीट कार्ड, १ लॅपटॉप, १ मेमरी कार्ड, १ पासपोर्ट, १३ हजार ५५० रुपये असा माल जप्त केला आहे.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते चायनीज व्यक्तीशी संगनमत करुन वेगवेगळे बँक खाती प्राप्त करुन या खात्यांचा वापर फसवणुकीसाठी चालवून त्यामध्ये फसवणुकीची रक्कम घेऊन ती रक्कम बाहेरील देशातील साथीदारांना क्रिप्टो करन्सी, यु एस डी टीचे माध्यमातून पाठवत. त्यांच्याकडून हवाला, मनि ट्रान्सफर व इतर मार्गाने ही रक्कम घेऊन सायबर फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रविण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दीपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिंदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, निलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दीपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांनी केली आहे़ सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवुन देण्यात मदत केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...