पुणे – स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 चा पहिला दिवस अत्यंत भव्य आणि अविस्मरणीय ठरला. नवरात्रीच्या पवित्र पर्वात भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांनी नटलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपूर्ण परिसर दांडियाच्या तालावर गजबजून गेला. नागरिकांच्या उपस्थितीने वातावरण प्रफुल्लित आणि उत्साहवर्धक झाले,या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे आणि माझी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विशेष प्रसंगी भारतातील सुप्रसिद्ध ड्रमर गिरीश विश्वा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा अनेक पटींनी वाढली, तर त्यांच्या “विश्वा रॉकर्स” टीमने सादर केलेल्या अद्भुत वाद्यवृंदाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले,सांस्कृतिक कार्यक्रमात लोकप्रिय गायक-गायिका पवन सिंह, शुभम सिंह, इशिता विश्वकर्मा आणि ऋतुजा जाधव यांनी मनमोहक आणि रंगतदार गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. नागरिकांनी ठेका धरत दांडियाचा आनंद घेतला आणि प्रत्येक क्षण भक्तिभाव व सांस्कृतिक उर्जेने नटला.
या आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवात उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य आणि उत्कृष्ट दांडिया ग्रुपसाठी अनुक्रमे 21 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या बक्षिसांची लॉटरी दररोज करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रत्येक सहभागीला आपल्या प्रतिभेची सादरीकरणाची संधी नियमित मिळणार आहे,विशेष म्हणजे उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब या भव्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ज्यामुळे महोत्सवाचा उत्साह आणखी शिखरावर पोहोचणार आहे.
फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी असंख्य नागरिकांनी प्रतिसाद देत भव्य, दिव्य आणि आनंददायी रास दांडिया अनुभवला ज्यातून येणाऱ्या प्रत्येक दिवशी भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. पुणेकरांना या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्याची संधी नक्कीच उत्साहवर्धक ठरेल, आणि दांडियाच्या तालावर नृत्य करताना साजरा होणारा उत्साह प्रत्येकाच्या स्मृतीत आनंदाचे अविस्मरणीय क्षण नोंदवून जाईल,यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, जिल्हा परिषद सदस्य, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई टकले, मच्छिंद्र दगडे, राकेश झांबरे, बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना महानगरप्रमुख राजेश पळसकर, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

