पुणे दि. 19 : कोंढवा बु. (जि. पुणे) येथे दि. २१ सप्टेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९ मे १९९० चे अधिसूचना यान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
दि. २१सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत एन.एच.-६५ व एन.एच.-९६५ दिवेघाट मार्गे सासवड येथे जाणारी वाहतूक बंद राहील व ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
जड व अवजड वाहने सासवड – दिवेघाट – मंतरवाडी चौक मार्गे वळविण्यात येतील.
हलकी वाहने (चार चाकी) सासवड – चांबळी – गराडे मार्गे मरीआई घाट – खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येतील.
वाहतुकीसाठी सासवड – कोंढवा – पुणे, सासवड – दिवेघाट – मंतरवाडी, सासवड – चांबळी – गराडे – मरीआई घाट – खेड शिवापूर – कात्रज घाट (चार चाकी) पर्यायी मार्गचा अवलंब करावा.

