पुणे- नवरात्री सारख्या सणाच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद ठेवणे योग्य आहे का? असा सवाल करत माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे , त्या म्हणाल्या पाणीपुरवठा प्रमुखांना महिलांनी आता समज देण्याची गरज आहे असे वाटते पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे… नदी-नाले ओसंडून वाहत आहेत…तरीही महापालिकेने पाणी बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रशासनाचा दृष्टीहीन व असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे.इतक्या पावसात पाणीटंचाईचा प्रश्न नसताना नागरिकांना पाणीपुरवठा बंद करून अडचणीत टाकणे हा सरळसरळ प्रशासनाचा अपयश व निष्काळजीपणा आहे.
- नवरात्रमध्ये प्रत्येक घरात स्वच्छता, नवे-जुने कपडे धुणे, उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते.
- पण ! महापालिकेने या काळातच पाणी बंद करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांच्या भावनांशी खेळ केला आहे.
– विशेषतः महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
- नगरसेवक / लोकप्रतिनिधी निवडून आले असते तर, प्रशासनाला सणासुदीच्या काळातील संवेदनशीलता समजली असती.
- चुकीच्या वेळेस पाणीपुरवठा बंद करून PMC प्रशासनाने स्वतःचं दुर्बल आणि असंवेदनशील व्यवस्थापन चव्हाट्यावर आणलं आहे.
पुणेकरांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून उत्सवाच्या काळात अन् भर पावसात पाणी बंद करून नागरिकांना अडचणीत टाकणाऱ्या या निर्णयाचा निषेध करत त्यांनी महिलांनी याबद्दल जाब विचारायलाच हवा असेही म्हटले आहे

