पुणे : चार दशकांची समृद्ध परंपरा असलेली ईपीसी आणि रिअल्टी क्षेत्रातील आघाडीची कंपनी वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ने मजबूत ईपीसी ऑर्डर बुक आणि पुढील 12–24 महिन्यांत झपाट्याने गती घेतील असे बांधकाम क्षेत्रातील आगामी मजबूत प्रकल्प यांवर प्रकाश टाकत आपल्या धोरणात्मक वाढीच्या दृष्टीकोनाची रूपरेषा स्पष्ट केली.
कंपनी सध्या 13 शहरांमध्ये सक्रिय असून ईपीसी व्यवसायासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांबरोबर ऑर्डर गुणोत्तर 75:25 या प्रमाणात काम करत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सुफल, बिहार येथील 606 कोटी रु. मूल्य असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, चेन्नईतील 416 कोटी रु. मूल्य असलेले केपजेमिनी आयटी पार्क प्रकल्प आणि 260 कोटी रु. मूल्य असलेला वेदांता टाऊनशिप प्रकल्प यांचा समावेश आहे.
या घोषणेबद्दल भाष्य करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “वॅस्कॉन इंजिनीयर्सची ताकद आमच्या ईपीसी आणि रिअल इस्टेट व्यवसायाचा समतोल प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये राखण्यात आहे. पुणे आणि मुंबई येथे सध्या काम सुरु असलेले मजबूत प्रकल्प आणि जवळजवळ 3,000 कोटी रु. ची ईपीसी ऑर्डर बुक तसेच चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त 2000 कोटी रु.च्या ऑर्डरचे लक्ष्य ठेवून आम्ही आमच्या वाढीचा प्रवास वेगाने पार करू असा आम्हाला विश्वास आहे.
मुंबई बाजारपेठेत, आम्ही ब्रँडेड आणि कॉर्पोरेट कंपन्या मर्यादित प्रमाणात असलेल्या 1–1.5 लाख चौरस फुट रेंजमधील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आम्हाला जलद गतीने पर्यावरण मंजुरी मिळते आणि बऱ्याचदा मोठ्या प्रकल्पांना उशीर करणाऱ्या क्लिष्ट मंजुरी चक्रांपासून बचाव होतो.
आमचे लक्ष उच्च-मूल्य ईपीसी करारांमध्ये आमचे स्थान वाढवण्यावर, शहरी केंद्रांमध्ये पुनर्विकास आधारित गृहनिर्माण वाढवण्यावर आणि वित्तीय शिस्त राखण्यावर आहे. जवळजवळ चार दशकांची परंपरा आणि भारतभर 225 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आम्ही गुणवत्ता, वेग आणि विश्वासाने सेवा वितरण करत आहोत.”
पुण्यात, वॅस्कॉन ने प्रमुख ईपीसी करारांद्वारे आपले स्थान मजबूत केले आहे. यात 262 कोटी रु. मूल्य असलेले पुणे पोलिस स्टाफ क्वार्टर्स आणि मोशी, पिंपरी चिंचवड येथील 277 कोटी रु. मूल्य असलेली रुग्णालय इमारत आणि 96 कोटी रु. मूल्य असलेला पीएमआरडीए मधील गृहनिर्माण प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांव्यतिरिक्त, ईपीसी ऑर्डर बुक जवळजवळ 3,000 कोटी रु. आहे. त्यामुळे पुढील 18–24 महिन्यांत निवासी, संस्थात्मक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्पष्ट अंमलबजावणी दृष्टीपथात आहे. रिअल इस्टेट क्षेत्राच्या बाबतीत पुणे महत्त्वाचे विकास केंद्र राहिले आहे. त्यात खाराडीतील टॉवर ऑफ असेंड आणि तळेगाव येथील गुड लाईफ प्रकल्प सुरू आहेत. कल्याणी नगर येथील नियोजित प्रकल्प 1700 कोटी रु. ची GDV भर घालण्याची शक्यता आहे. एकूणच, पुणे रिअल इस्टेट मधील काम सुरु असलेले प्रकल्प सुमारे 1.3 दशलक्ष चौरस फुट विकास दर्शवतात. त्यांची अपेक्षित विक्री किंमत जेव्ही मॉडेल अंतर्गत 1700-2000 कोटी रु. आहे.
मुंबईत सांताक्रुझ येथील वॅस्कॉन ऑर्चीडस आणि सांताक्रुझ पश्चिम येथील प्रकाश सीएचएस प्रकल्पांसह वॅस्कॉनने पुनर्विकास प्रणीत धोरण मजबूत केले आहे समावेश आहे. आगामी पवई निवासी प्रकल्प 425 कोटी रु. विक्री उत्पन्न देण्याची अपेक्षा आहे. सांताक्रुझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील पुनर्विकास आगामी प्रकल्प सुमारे 0.4 दशलक्ष चौरस फुट असून त्यांची अपेक्षित विक्री किंमत 1050 कोटी रु. आहे. आर्थिक वर्ष 27 पर्यंत मुंबईतील चालू आणि नियोजित प्रकल्प कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफ़ोलिओमध्ये सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकास व्यतिरिक्त, मुंबई आणि पश्चिम भारतातील ईपीसी संधी देखील सक्रियपणे शोधल्या जात आहेत. त्यात संस्थात्मक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील टेंडर कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाईपलाईनमध्ये भर घालत आहेत.
एकत्रितपणे, समग्र नजीकच्या काळातील रिअल इस्टेट प्रकल्प 1.94 दशलक्ष चौरस फुट असून त्याची अपेक्षित विक्री किंमत 2,360 कोटी रु. आहे. मिळालेल्या करारांची मजबूत अंमलबजावणी आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधील नवीन ऑर्डरचा सतत पुरवठा प्रतिबिंबित करत ईपीसी व्यवसाय जवळजवळ 85 टक्के क्षमता वापरावर कार्यरत आहे.

