नवीन बायोमेट्रिक सुविधा चेहरा आणि बोटांच्या स्कॅनवर आधारित आरोग्य तपासणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे सक्रिय आरोग्यजाणीव आणि डिजिटल सबलीकरणाला चालना मिळते.
मुंबई, 17 सप्टेंबर 2025 – भारतातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या मोबाईल अॅपवर नवे, नाविन्यपूर्ण व अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर सुरू केले आहे. आरोग्य आणि वेलनेसच्या प्रोत्साहनात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या नवीन सुविधेमध्ये प्रगत बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांना चेहरा किंवा बोटांचा स्कॅन करून सहजतेने महत्त्वाचे आरोग्य निर्देशक मिळवता येतात. ही योजना संपर्करहित, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पद्धतीद्वारे प्रोअॅक्टिव्ह वेलनेस साध्य करण्यासाठी राबविण्यात आली असून, वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्य व कल्याणाचे रिअल-टाइम व्यवस्थापन करण्यास मदत करते.
केअरप्लिक्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे हेल्थ ट्रॅकिंग फीचर वापरकर्त्यांना हृदयगती, श्वसनगती, रक्तदाब, बीएमआय, शारीरिक वजन, ताणाची पातळी, शरीरातील चरबी, शरीरातील पाण्याचे प्रमाण अशा अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशकांची माहिती उपलब्ध करून देते. फक्त चेहरा किंवा बोट स्कॅन केल्यावर वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण आढावा मिळतो, ज्यामुळे ते आपले वेलनेसविषयक निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सक्षमपणे घेऊ शकतात.
केअरप्लिक्सच्या नाविन्यपूर्ण रिमोट फोटोप्लेथिस्मोग्राफी (rPPG) तंत्रज्ञानाचा वापर करून हे फीचर फक्त मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेऱ्यामधून घेतलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंगद्वारे आरोग्यविषयक माहिती काढते. यामुळे वापरकर्ते कुठेही, केव्हाही, शारीरिक सेन्सर्स किंवा सुईंची गरज न पडता आपले आरोग्य तपासू शकतात.
लाँचिंगबाबत बोलताना श्री. मोहम्मद आरिफ खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एसबीआय जनरल इन्शुरन्स यांनी सांगितले, “हे नाविन्यपूर्ण हेल्थ स्कॅनिंग फीचर पारंपरिक विम्याच्या चौकटीपलीकडे जाऊन सहज उपलब्ध होणारी आरोग्यदृष्टी देण्याकडे एक मोठे पाऊल आहे. हे आमच्या डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यजागरूक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे, जेथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कल्याणाचे सक्रिय व्यवस्थापन करू शकेल. प्रोअॅक्टिव्ह वेलनेस आणि सुलभता यांचा संगम साधून हे फीचर आम्हाला हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात आघाडीवर नेते, जिथे नवकल्पना आणि सोयीसुविधा दैनंदिन जीवनाशी अखंडपणे जोडल्या जातात. कंपनी आपल्या ग्राहकांना प्रगत आणि वापरण्यास सुलभ उपाययोजना पुरवण्यासाठी तंत्रज्ञानातील आपली क्षमता सातत्याने वाढवत राहील.”
नवीन बायोमेट्रिक हेल्थ फीचर हे विद्यमान तसेच नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या अॅपद्वारे संलग्न सेवा प्रदात्यांकडून केल्या जाणाऱ्या नियमित लॅब टेस्टवर ग्राहकांना 5% सवलतही मिळते, ज्यामुळे त्यांना अधिक मूल्यवर्धनाचा लाभ होतो. वापरण्यास सुलभता आणि आरोग्य निर्देशकांना मिळणारी तत्काळ उपलब्धता हे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या डिजिटल पद्धतीने जोडलेला ग्राहकवर्ग तयार करण्याच्या बांधिलकीचे द्योतक आहे. तसेच, ग्राहकांना निरोगी राहण्यासाठी उपयुक्त साधने उपलब्ध करून देण्याचा हेतूही यात दिसून येतो.
या लाँचिंगमुळे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या डिजिटल प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, ग्राहक-केंद्रित नवकल्पना आणि पारंपरिक विम्याच्या पलीकडे जाऊन मूल्यवर्धित सेवा पुरवण्याच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळाली आहे. यामधून अधिक निरोगी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या ध्येयाला चालना मिळणार आहे.

