पुणे:समाजवादी आंदोलनाची ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात समाजवादी एकजूट परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे १९ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही परिषद होणार आहे. या परिषदेचे आयोजन राष्ट्र सेवा दल, एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, युसुफ मेहेरअली सेंटर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व समाजवादी समागम यांनी संयुक्तपणे केले आहे.
आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संयोजक डॉ.एन.सुनीलम,अन्वर राजन, अॅड.सविता शिंदे,साधना शिंदे,राहुल भोसले, संदेश दिवेकर,दत्ता पाकिरे यांनी ही माहिती दिली.परिषदेचे उद्घाटन उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्या हस्ते होईल, ध्वजारोहण १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी व माजी खासदार पंडित रामकिशन करतील. समाजवादी आंदोलनावरील प्रदर्शनाचे लोकार्पण राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सत्रात प्रा. आनंद कुमार हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर सुभाष वारे हे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतील. तर स्वागतपर आषण अॅड. सविता शिंदे देतील.
अध्यक्षस्थानी रमाशंकर सिंह (कुलपती, आयटीएम विद्यापीठ) तर प्रमुख पाहुणे म्हणून हरभजनसिंग सिद्धू (महामंत्री, हिंद मजदूर सभा) हे उपस्थित असतील. उद्द्घाटन सत्रात आयोजक संस्था आपली मते मांडतील, स्मारिकेचे व पुस्तकांचे प्रकाशन होईल. तसेच पंडित रामकिशन शर्मा, पन्नालाल सुराणा, प्रा. राजकुमार जैन, हिम्मत सेठ, चंद्रा अय्यर, भीमराव पाटोले, रावसाहेब पवार, वर्षा गुप्ते, प्रमिला ठाकूर -फुले, उमाकांत भावसार यांसारख्या ज्येष्ठ समाजवाद्यांचा सन्मान केला जाईल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी :२० सप्टेंबर
आर्थिक आव्हाने बेरोजगारी पर्यावरण संकट आणि भारताचा पर्यायी विकास मॉडेल या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्षपद मेधा पाटकर भूषवतील. प्रा. नीरज हातेकर, पर्यावरणतज्ज सौम्य दत्ता, सुनीता बागल, अॅड. आराधना भार्गव हे प्रमुख वक्ते असतील. संचालन प्रफुल्ल सामंत्रा करतील.
त्यानंतरच्या सत्रात सामाजिक न्याय जनआंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी असतील.बी.जी. कोळसे पाटील, हुसैन दलवाई, निरंजन टकले, टी. गोपालसिंग, मधु मोहिते, सुशीला ताई मोराळे, अॅड. रत्ना बोरा, टी. पी. जोसेफ हे प्रमुख वक्ते असतील. सूत्रसंचालन सुभाष लोमटे करतील.
त्यानंतर ‘समाजवादी आंदोलनाची ९० वर्षे -व्यापक एकजुटीची गरज ‘ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी बी. आर.पाटील हे असतील, तर योगेंद्र यादव, रामधीरज, जावेद अली, अबू आझमी तसेच कांग्रेस, राष्ट्रवादी, राजद, सीपी आय, सीपीएम, सीपीआय एमएल, फॉरवर्ड ब्लॉक, एसयूसीआय, शेकाप या पक्षांचे नेते उपस्थित राहतील एन एस. देवरावर देखील सहभागी होतील या स त्रात स्मरणिकेचे लोकार्पण होईल
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी संविधान व लोकशाहीवरील धोके सांप्रदायिकलेची देश तोडणारी आव्हाने या विषयावर परिसंवाद होईल. डॉ मनीषा गुप्ते, जयशंकर पांडेय, अन्वर राजन, पा. शशिशेखर सिंह, मीर शाहिद सलीम, राधवेन्द्र दुबे वक्ते असतील. संचालन गुड्डी एस. एल. करतील.
त्यानतर पुणे घोषणा पत्र २०२५ या विषयावर सहावे सत्र होईल. गीता आर. व सुनीती हे घोषणा पत्र सादर करतील अध्यक्षपद अविनाश पाटील भूषवतील, उल्का महाजन, अशोक चौधरी, अमूल्य निधी, विनोद सिरसाट, हरिशंकर मिश्रा, प्रभात, रेजीनार्क, मंथन, हरीश खन्ना, पुतुल कुमारी आपली मते मांडतील.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रश्न शांतता व न्यायासाठी एकजूट या विषयावर सातवे सत्र होईल. अध्यक्षपदी फिरोज मिठीबोरवाला हे असतील. तर गुख्य वक्ते प्रा. डी. के. गिरी असतील
२१ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी राजकुमार जैन असतील. प्रमुख पाहुणे एल. काल्लपा (अध्यक्ष, हिंद मजदुर किसान पंचायत) असतील. समारोप भाषण रमाशंकर सिंह देतील.सूत्रसंचालन अरुणकुमार श्रीवास्तव करतील.
संमेलनाच्या तिन्ही दिवशी सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संदेश दिवेकर, साधना शिंदे, दत्ता पाकिरे आणि शिवराज हे आभार व्यक्त करतील. या संमेलनात युवा समाजवादी संचालन समितीची स्थापना होईल. पुढील १० वर्ष देशभरात या समितीमार्फत पुणे घोषणा पत्रनुसार कार्यक्रम होतील

