पुणे-भारत फोर्ज लिमिटेड अभिमानाने जाहीर करत आहे की त्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा कल्याणी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (ASME) कडून अत्यंत प्रतिष्ठेचे हॉले मेडल प्रदान करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी अभियांत्रिकी नाविन्यपूर्णता क्षेत्रातील सर्वाधिक सन्माननीय जागतिक मान्यतापैकी एक असा हा सन्मान आहे.
ASME हॉले अवार्डला 1924 मध्ये सुरुवात झाली. या सन्मानाद्वारे एक किंवा अधिक व्यक्तींनी एकाच कामगिरीतून लक्षणीय आणि समयोचित अशा सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी केलेल्या उत्कृष्ट आणि अद्वितीय अभियांत्रिकी कार्याची दखल घेतली जाते.
सध्याच्या वाढलेल्या अमेरिकन टॅरीफच्या परिस्थितीत या सन्मानाला विशेष महत्त्व आहे. भारत फोर्ज अमेरिकेत आणि जागतिक स्तरावर अभियांत्रिकी-आधारित मूल्यनिर्मितीद्वारे व्यापारातील बदलत्या घडामोडींना कसे सामोरे जात आहे हे यातून अधोरेखित होते. प्रगत उत्पादनाचे स्थानिकीकरण करून आणि स्थानिक उद्योगांच्या गरजा पूर्ण करून भारत फोर्ज श्री. कल्याणी यांचा मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय कार्यक्षमतेत योगदान देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबीत करत आहे.
हा सन्मान केवळ श्री. कल्याणींच्या नेतृत्वाचा गौरव करत नाही तर अमेरिकेच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्यात मूळच्या भारतीय अभियांत्रिकी उत्कृष्टतेची भूमिकाही अधोरेखित करतो. यातून भारत फोर्जच्या अमेरिकेशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांना अधोरेखित केले जात असून आव्हानात्मक कठीण व्यापारचक्रात देखील सीमापार सहयोग कसा फुलू शकतो याचे हे द्योतक आहे.

