मुंबई- PM मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीप ही फोटोखाली देणार आहात का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंच्या वापरावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यासोबतच जीएसटीमुळे जनतेची आर्थिक फसवणूक झाल्याची ‘तळटीप’ही लावावी, असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? असा सवालही त्यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा जी एसटी (GST) वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीपही फोटोखाली देणार आहात का? जीएसटीमुळे सर्वात मोठी पाकीट मारी (20 लाख कोटी) महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात ही तळटीप असलेले फोटोच लावावे लागतील.कदाचित हे फोटो लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कल्पनाही नसेल, पण नेत्यांना खूश करण्यासाठी आजूबाजूचे काही नेते अशा करामती करतात.
मेघा इंजिनिअरिंगने जाहिरात केली का?
रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापल नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवा भाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

