जय शहा आयोजक असल्याने भारत-पाक मॅचमागे ‘पैशाचा खेळ’-मोदी-शहा हे देशभक्तीचे केवळ ढोंग करतात
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या मुलाला देशभक्ती शिकवता आली नाही त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तुमचा मुलगा दुबईत बसून भारत-पाकिस्तान मॅचचे आयोजन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पदावरून जावे लागेल त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या 26 लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या 26 लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता
खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळत आहात. म्हणून आपल्या देशात नेपाळ सारखी परिस्थिती होईल हे मी वारंवार सांगत आहे. अमित शहा आम्हाला बाळासाहेब शिकवत आहेत. बाळासाहेब असते तर हे झाले नसते ते झाले नसते असे म्हणणाऱ्या शहा यांना सांगतो की बाळासाहेब असते तर आजचा मॅच झाला नसता.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परवानगी देणं ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात आमचे 26 जण ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील पुसला गेलेला सिंदूर यावर मोदींनी खूप राजकीय ढोंग केले त्यांचे काय झाले. मोदी-शहा हे राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे केवळ ढोंग करतात. यापूर्वी अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारताने माघार घेतली आहे.
संजय राऊत म्हणाले की, जय शहा दुबईत आहे आणि ते सामन्याला जाणार नाही असे किती तरी मोठे उपकार त्यांनी केले आहेत.सामना तुम्ही आयोजित केला आहे, तुम्ही त्यांचे प्रमुख आहात. देशभक्ती संदर्भात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजपचे पापा वॉर रुकवा सकते है पण भारत-पाकिस्तान सामना रोखू शकत नाही. रशिया-युक्रेनचे वॉर थांबवू शकतात, ट्रम्प च्या दबावाखाली भारत-पाकिस्तान युद्ध थांबवू शकतात, पण भारत-पाकिस्तान मॅच थांबवू शकत नाही. यात कोणता पैशाचा खेळ आहे, या खेळात नेमके कोण कोण गुंतलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ज्या आंदोलनाची घोषणा केली त्यांची व्याप्ती देशभरात गेली आहे. अनेक राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. दिल्लीत ही मॅच दाखवली जाईल त्या हॉटेलवर बहिष्कार टाकावे असे आवाहन आपने केले आहे.महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे.
संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान मॅचची तिकीट विक्री होत नाहीये. पण गॅमलिंग होणार कारण तिकडे जय शहा बसले आहेत. नरेंद्र मोदी यांची काय मजबुरी आहे की त्यांना भारत-पाकिस्तानची मॅच खेळवा-वी लागत आहे. नरेंद्र मोदी काल मणिपूरला गेले ते केवळ मॅचला होणाऱ्या विरोधावरुन लक्ष विचलित व्हावे म्हणून त्यांनी हा दौरा केला आहे. भाजपचा राष्ट्रवाद हा जगातील सर्वांत मोठे ढोंग आहे. मणिपूरच्या जनतेविषयी काही प्रेम आहे असे त्यात काही नाही. त्यांचा हिंदुत्ववाद म्हणजे ढोंग आहे.
..तर काय बिघडलं असते
संजय राऊत म्हणाले की, आजची मॅच खेळण्यासाठी अनेकांनी नकार दिला आहे. पण जे खेळाडू आज मॅच खेळतील त्यांना लाज वाटली पाहिजे. त्या खेळाची रक्कम घेताना त्यांनी ही लक्षात ठेवावे की आमच्या मारले गेलेल्या लोकांच्या रक्ताची ते किंमत घेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.त्यांच्या मनात राष्ट्रवाद नाही का? भारतीयांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या का? एक सामना खेळले नाही तर काय होणार होते? अमित शहा काय ईडी लावून जेलमध्ये टाकले असते का? जय शहा यांनी फाशी दिली असती का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
खेळाडूंनी सांगितले असते आम्ही खेळणार नाही तर काय झाले असते.
संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानी मोहसीन नकवीच्या हाताखाली भाजपचे आशिष शेलार काम करत आहेत, त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा होता त्या बोर्डाचा. मॅच रद्द करता येत नसेल तर जय शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार. बाळासाहेब ठाकरे यांनी असा व्यापार केला नाही. मोदी, शहा, शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी फोटो वापरू नये.

