पुणे- ते भारतात घुसतात , आपले निष्पाप लोक मारतात , सीमेवर सैनिकांचे रक्त वाहते आणि आपणहि त्यांच्याविरोधात युध्द पुकारतो त्यांचे पाणी बंद करतो अन … दुसरीकडे .. दुसरीकडे काय त्यांच्याशी क्रिकेट खेळायचे ? कशासाठी ? हा कसला व्यापार ?हि कसली आणि कोणती व्यापारी वृत्ती? असे सवाल करत पाकबरोबर क्रिकेट खेळणे, म्हणजे शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाणे अशा शब्दात आम आदमी पार्टीने येथे भाजपवर प्रहार केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले,अनिकेत शिंदे,सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांनी येथे तीव्र निदर्शने करत भाजपा सरकारचा जोरदार निषेध नोंदविला
मुकुंद किर्दत म्हणाले,’ रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे ‘एशिया कप’ या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पहलगाम घाटीत २६ निष्पाप लोकांची हत्या करण्यात केली होती.या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई पण सुरू झाली आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहिदांचा अपमान आहे ज्या देशाने पहेलगाम येथे भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्या मागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता, मजबुरी आहे? काही ठराविक आर्थिक हितसंबंधासाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही.
आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो!’ असे सांगत त्यांनी येथे आम आदमी पार्टी तर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चा टी-शर्ट जाळला.

