~ महत्वाचे LEAP इंजिन घटक उत्पादनासाठी
मुंबई, 12 सप्टेंबर 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस बिझनेसने जागतिक दर्जाचे व्यावसायिक आणि लष्करी इंजिन उत्पादक साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबत करार केला असल्याचे आज जाहीर केले. पाच वर्षांच्या या करारांतर्गत गोदरेज जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्यावसायिक विमान इंजिन्सपैकी एक असलेल्या LEAP इंजिन्स साठी टीटॅनियम मटेरियलवर आधारित कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीज विकसित करेल.
CFM इंटरनॅशनल द्वारे विकसित LEAP इंजिन्स हे अत्याधुनिक नॅरो-बॉडी एअरक्राफ्टला शक्ती देतात. हा टप्पा भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमतेला पुढे नेण्याच्या गोदरेजच्या बांधिलकीला बळकट करतो. जागतिक एअरक्राफ्ट इंजिन OEMs साठी एक प्रमुख पुरवठादार होण्याच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे. उत्पादनामध्ये गुंतागुंतीचे यांत्रिकीकरण, अचूक वेल्डिंग आणि नागरी विमान वाहतुकीच्या कठोर मानकांना पूर्ण करण्यासाठी प्रगत नॉन-डिस्ट्रक्टिव टेस्टिंगचा समावेश असेल.
इंजिनच्या मेन टर्बाइन शाफ्टमध्ये असणाऱ्या कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीजसाठी प्रगत उत्पादन अचूकता आणि कठोर गुणवत्ता मानकांची आवश्यकता आहे. या ऑर्डरसह, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने साफ्रान सोबतची आपली दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ केली आहे आणि जागतिक एरो-इंजिन प्रोग्राम्सना पाठबळ देण्याची आपली भूमिका विस्तारली आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या एअरोस्पेस बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, “हा करार म्हणजे गोदरेजच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेची पावती आहे आणि जागतिक एअरोस्पेस इकोसिस्टममध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेची एक ठळक प्रचीती आहे. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांचे उत्पादन भारतातच करून आम्ही मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत. आमची साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबतची भागीदारी गुणवत्ता, विश्वासार्हता आणि जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्णता यासाठी आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे.”
साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या खरेदी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉमिनिक डुपुई म्हणाले, “या नव्या LEAP प्रोग्राम मँडेटसह आम्ही एक विश्वासार्ह भागीदारी मजबूत करत आहोत. साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या मजबूत आणि वैविध्यपूर्ण जागतिक पुरवठा साखळी तयार करण्याच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप सोबतच्या या दीर्घकालीन भागीदारीचा विस्तार करून आम्ही LEAP प्रोग्रामला पाठबळ देत आहोत आणि जागतिक एअरोस्पेस क्षेत्रामध्ये भारताला एक स्ट्रॅटेजिक हब म्हणून दीर्घकालीन औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या साफ्रानच्या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत.”
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एअरोस्पेस बिझनेस गेल्या चार दशकांपासून भारताच्या हवाईक्षेत्र परिसंस्थेमधील एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे. त्यांनी महत्वपूर्ण अवकाश आणि संरक्षण प्रोग्राम्स तसेच व्यावसायिक विमानवाहतुकीत योगदान दिले आहे. या नव्या करारासह, कंपनीने उच्च प्रतीच्या अचूक एअरोस्पेस घटकांसाठी एक प्रमुख जागतिक पुरवठादार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

