पुणे- कात्रज,धनकवडी,कोंढवा,वारजे, आंबेगाव पठार , आदी भागात अनधिकृत इमारती बेसुमार आणि अत्यंत वेगाने वाढत असताना PMC चा बांधकाम परवाना नसलेली अनधिकृत बांधकामे नागरिकांनी खरेदी करू नयेत , तसेच रीडेव्हलपमेंट च्या नावाने केलेली विनापरवाना बांधकामे खरेदी करू नयेत अन्यथा एक न एक दिवस महापालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देत महापालिकेने आज कोंढव्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु केली .
कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.12/9/2025 रोजी कोंढवा खुर्द , शिवनेरी नगर गल्ली क्र. 1, मध्ये P+5 व P+4 मजला दोन इमारती सुमारे 15000 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई साठी 10 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 6 कनिष्ठ अभियंता, 3 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असेही आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

