नवीन कार्यकारिणी २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी निवड
पुणे : स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चेंटस् असोसिएशन च्या अध्यक्षपदी संजय राठी यांनी निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदी नितीन पंडित, सेक्रेटरी किशोर चांडक, सह सेक्रेटरी मनिष परदेशी आणि खजिनदारपदी सुनील शिंगवी यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारिणी २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी असणार आहे.
नुकतेच शुक्रवार पेठेतील वरदश्री सभागृह येथे झालेल्या संस्थेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष संजय राठी हे कर्वे रस्त्यावरील सागर स्विटसचे संचालक आहेत. संस्थेच्या परंपरेप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ व्यापाऱ्यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले.
सभेला संस्थेचे सचिन जोशी, संजय राठी, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सुरेश नेऊरगावकर, दिलीप कुंभोजकर, मदनसिंह राजपूत, अरविंद पटवर्धन, सूर्यकांत पाठक, राजेश गांधी, सुनिल शिंगवी, मनिष परदेशी, अनिल प्रभुणे, राजकुमार गोयल, मोहन साखरिया, अविनाश मुजुमदार इ. कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, सल्लागार, विश्वस्त व सदस्य उपस्थित होते.
गेली ६४ वर्ष अविरतपणे कार्यरत असलेली ही असोसिएशन पुण्यातील जुनी रजिस्टर्ड संस्था आहे. व्यापार क्षेत्रात व्यापाऱ्यांना येणाऱ्या प्रश्नांवर काम करणारी संस्था आहे. दरवर्षी व्यापार क्षेत्रात उपयोगी विषयांवर सेमीनारचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी ‘व्यापार भूषण पुरस्कार’ व इतर पाच पुरस्कार यामध्ये महिला पुरस्काराचाही समावेश केला जातो. व्यापार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यापाऱ्यांना एक कौतुकाची थाप मिळावी या कारणास्तव २५ मे रोजी ‘व्यापारी एकता दिनानिमित्त’ हा पुरस्काराचा कार्यक्रम केला जातो. येते.

