नवी दिल्ली – विनफास्ट या कंपनीने आज भारतात आपल्या बहुप्रतीक्षित प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या. यात स्मार्ट व स्लीक स्वरुपाचे व्हीएफ-६ आणि स्पोर्टी व सुबक रूप असलेले व्हीएफ-७ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. या सादरीकरणातून भारताच्या झपाट्याने विस्तारत असलेल्या ईव्ही बाजारपेठेत विनफास्टचे पहिले पाऊल पडले असून, देशाच्या हरित आणि शाश्वत गतिशीलतेकडे होणाऱ्या संक्रमणाला पाठबळ देण्याची कंपनीची ठाम बांधिलकी अधोरेखित झाली आहे. भारताच्या ईव्ही भविष्याची दिशा ठरवणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मानसही विनफास्टने यावेळी स्पष्ट केला.
कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि तंत्रज्ञान यासाठी भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर स्वीकारू लागले आहे. अशा वेळी त्यांच्या अपेक्षांना साजेशा एसयूव्ही विनफास्टने तयार केल्या आहेत. व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ या दोन्ही गाड्यांमध्ये रेंज, आराम, सुरक्षा आणि आधुनिक वैशिष्ट्ये यांचा मिलाफ आहे. प्रीमियम ईव्ही मालकीचा अनुभव या गाड्या नव्याने परिभाषित करणार आहेत. त्या बाजारात उतरवून विनफास्टने देशातील परिवर्तनाला गती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा चांगला अनुभव असलेल्या विनफास्टने भारतातील स्थानिक बाजारपेठेत बळकट स्थान मिळवून येथील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
या प्रसंगी विनफास्ट एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सँह चाउ म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आम्ही अशा गाड्या सादर केल्या आहेत, ज्या केवळ भारतात तयार झाल्या नाहीत, तर भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही एक संपूर्ण इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्टम सादर करीत आहोत, जी भारतीय कुटुंबांचा विचार करून काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ ही वाहने व्यावहारिक डिझाइन, प्रीमियम दर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या सुंदर संयोगातून बनली आहेत. अशाच गाड्यांची भारतीय ग्राहकांना अपेक्षा असते. थुथुकुडीतील आमच्या अत्याधुनिक कारखान्याच्या आणि इथल्या परिसंस्थेशी केलेल्या मजबूत भागीदारीच्या बळावर, आम्ही जागतिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अग्रगण्य बनण्याच्या भारताच्या ध्येयाला पाठबळ देण्यास कटिबद्ध आहोत.”
भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेल्या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या गतिमान बाजारपेठेत विनफास्टने अगदी योग्य वेळी पाऊल ठेवले आहे. या क्षेत्रात अभूतपूर्व वाढ होत असून प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हींसाठी ग्राहकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उच्च श्रेणीतील वाहनांत आढळणारी प्रगत वैशिष्ट्ये, अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि विक्रीनंतरची संपूर्ण सेवा या गोष्टी शाश्वत तंत्रज्ञानावरील वाहने हवी असणाऱ्या भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यावर कंपनीचा भर आहे.
विनफास्ट व्हीएफ–६
‘निसर्गातील द्वैत’ या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन व्हीएफ-६ ही प्रीमियम कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही बनविण्यात आली आहे. आनंद आणि आलिशानता, तंत्रज्ञान आणि मानवी केंद्रीतता या भिन्न गुणांचा सुंदर संगम साधत ही गाडी उत्कृष्ट कामगिरीचा व वैशिष्ट्यांचा अप्रतिम अनुभव देते.
विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ५९.६ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक असून, फक्त २५ मिनिटांत बॅटरी १० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. एआरएआय प्रमाणित ४६८ किमीपर्यंतची रेंज, २,७३० मिमी लांबीचा व्हीलबेस आणि १९० मिमी इतका ग्राउंड क्लीयरन्स ही वैशिष्ट्ये भारतीय कुटुंबांच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
ग्राहकांसाठी विविध पर्याय – व्हीएफ-६ प्रीमियम एसयूव्ही ही दोन इंटेरियर ट्रिम रंगांमध्ये आणि अर्थ, विंड आणि विंड इन्फिनिटी या नावाच्या तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे.
• व्हीएफ–६ अर्थ – या मॉडेलमध्ये १३० किलोवॅटची कमाल पॉवर आणि २५० एनएम टॉर्कची क्षमता आहे. आरामदायी प्रवासासाठी स्वतंत्र रिअर सस्पेन्शन देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग शैलीनुसार व मूडनुसार बदलता येणारे विविध ड्राइव्ह मोड्स उपलब्ध आहेत. गाडीच्या आतील भागात सर्वकाळ सुंदर वाटणारे ऑल-ब्लॅक इंटिरिअर आहे. १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, स्वयंचलित एसी, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट असलेली ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल ही सर्व उपकरणे गाडीत स्टॅंडर्ड स्वरूपात मिळतात. गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पियानोवरून प्रेरित गिअर सिलेक्टर. यामध्ये स्वतंत्र ड्राइव्ह मोड बटण, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो-होल्ड ही आधुनिक सोय देण्यात आलेली आहे.
• व्हीएफ-६ विंड – या मॉडेलमध्ये १५० किलोवॅटची कमाल पॉवर आणि ३१० एनएम टॉर्क आहे. ही गाडी केवळ ८.९ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास इतका वेग गाठते आणि त्यामुळे रोमांचक परफॉर्मन्स देते. गाडीच्या आतील भागात मोक्का ब्राऊन रंगसंगती, प्रीमियम व्हेगन लेदर अपहोल्स्ट्री, आठ प्रकारे अॅडजस्ट करता येणारी इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट आणि पुढील सीट्ससाठी व्हेंटिलेशन अशा सोयी आहेत. ड्युअल-झोन एसी, एअर आयोनायझर आणि पीएम १.० एअर फिल्ट्रेशनमुळे प्रवाशांना नेहमीच आरामदायी वातावरण मिळते. आठ स्पीकर्स असलेली ऑडिओ सिस्टीम, रंगीत एचयूडी प्रोजेक्शन, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, तसेच समोर आणि मागे ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंगसह लेव्हल-टू एडीएएस पॅकेज या गाडीत दिले आहे. याशिवाय १८ इंची मशीन-कट अलॉय व्हील्स या गाडीच्या डिझाइनला अधिक प्रभावी बनवतात.
• व्हीएफ–६ विंड इन्फिनिटी – या मॉडेलमध्ये व्हीएफ-६ विंडची सर्व वैशिष्ट्ये आहेतच, त्याव्यतिरिक्त एज-टू-एज पॅनोरामिक फिक्स्ड ग्लास रूफ देण्यात आले आहे.
• एआरएआयची प्रमाणित रेंज – अर्थ : ४६८ किमी, विंड : ४६३ किमी.
व्हीएफ–६ मॉडेलमध्ये असलेल्या अनेक आधुनिक आणि आकर्षक सुविधा – या गाडीत ऑटो लेव्हलिंगसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि पुढील-मागील भागात सिग्नेचर लाईट्स आहेत. अॅकॉस्टिक विंडशील्ड आणि काचेचे छत यामुळे गाडीला प्रीमियम लूक मिळतो. रिव्हर्स लिंक असलेले ओआरव्हीएम, की-लेस एन्ट्री आणि स्टार्टची सोय, तसेच ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट उपलब्ध आहे. ऑटो एसी, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप-डाउन आणि अँटी-पिंच सुविधा, बेझल-लेस ऑटो डिमिंग आयआरव्हीएम या सोयी गाडीला अधिक आरामशीर बनवतात. सुरक्षेच्या दृष्टीने एबीएस, ईबीडी, बीए, ईएससी, टीसीएस, एचएसए, आरओएम, ईएसएस अशा अत्याधुनिक प्रणालींसह सर्व चाकांवर डिस्क ब्रेक्स दिले आहेत. पावसाचे थेंब ओळखून कार्यान्वित होणारे रेन-सेन्सिंग वायपर्स, सात एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (डीटीपीएमएस), ३६० अंशांत फिरणारा सराऊंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) आणि क्रूझ कंट्रोल यामुळे सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे. मनोरंजन आणि तंत्रज्ञानासाठी १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस एएसीपी, सहा स्पीकर्स, ड्रायव्हिंगचे व रिजनचे विविध मोड्स आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानाची जोड गाडीला स्मार्ट, स्टायलिश आणि पूर्णतः सुसज्ज बनवते.
विनफास्ट व्हीएफ–७
“विश्व हे असमतोल आहे” या डिझाईन तत्त्वावर आधारलेल्या व्हीएफ-७मध्ये दमदार बाह्यरचना आणि प्रीमियम दर्जाचे इंटेरियर यांचा उत्कृष्ट संगम साधण्यात आला आहे. ही मोठी एसयूव्ही असून तिची लांबी ४.५ मीटरपेक्षा जास्त आहे आणि तिचा व्हीलबेस २,८४० मिमी आहे. दोन बॅटरी पॅक आणि पाच व्हेरियंट्समध्ये व्हीएफ-७ मॉडेल उपलब्ध होणार आहे. अर्थ, विंड, विंड इन्फिनिटी, स्काय आणि स्काय इन्फिनिटी असे हे व्हेरियन्ट आहेत. तसेच या गाडीत दोन इंटेरियर रंगांचे पर्याय आणि एफडब्ल्यूडी (फ्रंट-व्हील ड्राइव्ह) आणि एडब्ल्यूडी (ऑल-व्हील ड्राइव्ह) अशी दोन ड्राइव्हट्रेन कॉन्फिगरेशन्स उपलब्ध असतील.
• व्हीएफ–७ अर्थ – या गाडीत ५९.६ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून, १३० केडब्ल्यू पीक पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क निर्माण करणारी मोटर आहे. फक्त २४ मिनिटांत बॅटरी १० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. गाडीचे इंटिरियर स्पोर्टी ब्लॅक व्हेगन लेदरने सजवलेले असून, कलर्ड एचयूडी प्रोजेक्शन, पावसाचा अंदाज घेऊन चालणारे रेन-सेन्सिंग वायपर्स, ड्युअल-झोन एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट असलेली ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल आणि १९ इंचांची मोठी अलॉय व्हील्स या सर्व सुविधा प्रमाणित स्वरूपात उपलब्ध आहेत. याशिवाय, पियानोवरून प्रेरणा घेतलेला गिअर सिलेक्टर हा गाडीच्या डिझाइनला वेगळेपण देतो. यात स्वतंत्र ड्राईव्ह मोड बटण, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्डसारख्या आधुनिक सुविधाही आहे. त्यामुळे गाडीला एकाचवेळी स्पोर्टी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व प्राप्त होते.
• व्हीएफ–७ विंड – या मॉडेलमध्ये अधिक मोठा ७०.८ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून, पीएमएसएम मोटरमधून १५० केडब्ल्यू कमाल शक्ती आणि ३१० एनएम पीक टॉर्क मिळतो. गाडी फक्त ९.५ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास असा वेग गाठू शकते. बॅटरीचे १० ते ७० टक्के चार्जिंग केवळ २८ मिनिटांत पूर्ण होते. स्पोर्टी ब्लॅक रंगात रंगवलेले १९ इंची अलॉय व्हील्स, पॉवर्ड टेलगेट, आठ प्रकारे अॅडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट, वायुवीजन असलेल्या पुढील सीट्स, आठ स्पीकर्सची ऑडिओ सिस्टीम या सर्व सुविधा गाडीला अधिक आरामदायी आणि आधुनिक बनवतात. याशिवाय, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि पूर्ण एडीएएस लेव्हल-टू पॅकेजमधील अनेक अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यात स्टिअरिंगवर बसवलेला ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरा आणि चालकाच्या विचलनाचा इशारा देणारी स्मार्ट यंत्रणाही समाविष्ट आहे. मोक्का ब्राऊन रंगातील प्रीमियम व्हेगन लेदर इंटिरियर्स गाडीच्या आभामंडळात अधिक श्रीमंतीची भर घालतात.
• व्हीएफ–७ स्काय – या व्हेरिएंटमध्ये व्हीएफ-७ विंडमधील सर्व सुविधा तर आहेतच, शिवाय ड्युअल मोटर सेटअपमुळे तब्बल २६० केडब्ल्यू एकत्रित कमाल शक्ती आणि ५०० एनएम पीक टॉर्क निर्माण होतो. यामुळे गाडीला एडब्ल्यूडी म्हणजेच ऑल-व्हील ड्राइव्हची क्षमता मिळते आणि ती फक्त ५.८ सेकंदांत शून्य ते शंभर किमी प्रतितास असा वेग गाठू शकते.
• व्हीएफ–७ विंड इन्फिनिटी व व्हीएफ–७ स्काय इन्फिनिटी – यामध्ये एज-टू-एज पॅनोरामिक फिक्स्ड ग्लास रूफ हे अतिरिक्त आकर्षण आहे.
एआरएआय प्रमाणित रेंज – अर्थ : ४३८ किमी, विंड : ५३२ किमी, स्काय : ५१० किमी.
व्हीएफ–७मधील स्टॅंडर्ड वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत – या मॉडेलमध्ये १९ इंचांची मोठी अलॉय व्हील्स, ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्शन्ससह हीटेड ओआरव्हीएम, फ्लश डोअर हँडल्स, रंगीत एचयूडी प्रोजेक्शन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चार्ज करण्यासाठी ९० वॅट क्षमतेचा सी-टाईप यूएसबी पोर्ट आणि ड्युअल-झोन एअर कंडिशनिंग अशा सोयी आहेत. गाडीत ऑटो लेव्हलिंगसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पुढे-मागे सिग्नेचर लाईट्स, अॅकॉस्टिक विंडशील्ड आणि काचेचे छत, रिव्हर्स लिंक ओआरव्हीएम, की-लेस एन्ट्री आणि स्टार्ट, ड्रायव्हर सीटसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, ऑटो एसी, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप-डाउन आणि अँटी-पिंच सुविधा तसेच बेझललेस ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडी, बीए, ईएससी, टीसीएस, एचएसए, आरओएम, ईएसएस या आधुनिक प्रणालींसह सर्व चाकांवर डिस्क ब्रेक्स दिले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन आपोआप सुरू होणारे वायपर्स, सात एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (डीटीपीएमएस), ३६० अंशांत फिरणारा सराऊंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) आणि क्रूझ कंट्रोल यामुळे सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे. मनोरंजनासाठी १२.९ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस एएसीपी, सहा स्पीकर्स, ड्राईव्हिंगचे व रिजनचे विविध मोड्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीची जोड या सर्व गोष्टी या गाडीला एकाचवेळी स्मार्ट, आरामदायी आणि प्रगत स्वरूप देतात.
संपूर्ण परिसंस्थेच्या भागीदारीतून बाजारपेठेत प्रवेश
विनफास्टने ग्राहकांना समाधानकारक मालकीचा अनुभव मिळावा यासाठी मजबूत आणि व्यापक परिसंस्था उभारली आहे. कंपनीने प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी करून ग्राहकांसाठी विशेष वित्तयोजना उपलब्ध केल्या आहेत. रोडग्रिड, मायटिव्हीएस आणि ग्लोबल अश्युअर यांच्यासोबतच्या धोरणात्मक सहकार्यातून देशभरात चार्जिंग सुविधा आणि विक्रीनंतरच्या सेवांचे जाळे उभारले जात आहे. शाश्वततेबाबतच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेताना विनफास्टने बॅटएक्स एनर्जीजसोबत हातमिळवणी केली आहे. त्या माध्यमातून प्रगत बॅटरी रीसायकलिंग आणि सर्क्युलर बॅटरी मूल्यसाखळी तयार केली जाईल. या सर्व उपक्रमांमधून कंपनी जबाबदार आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी हरित भवितव्य घडवण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला मूर्त रूप देत आहे.
वितरकांचे देशव्यापी नेटवर्क आणि मेड–इन–इंडिया उत्पादन
विनफास्ट इंडिया देशभरातील आपली उपस्थिती झपाट्याने वाढवत आहे. कंपनीने २०२५च्या अखेरीस २७ शहरांमध्ये ३५ डिलर टचपॉईंट्स आणि २६ वर्कशॉप्स सुरू करण्याची योजना आखली आहे. यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, जयपूर, कोची आणि लखनौ यांसारख्या महानगरांबरोबरच उदयोन्मुख ईव्ही केंद्रांचा समावेश आहे.
तामिळनाडूतील थूथुकुडी येथील अत्याधुनिक कारखाना हा कंपनीच्या भारतातील धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. या कारखान्यात व्हीएफ-६ आणि व्हीएफ-७ या दोन्ही गाड्यांची असेंब्ली होणार आहे. उत्पादनाचे व निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या धोरणानुसार हा कारखाना तामिळनाडूत उभारण्यात आला आहे. या कारखान्याचे स्थान बंदराजवळ असल्याने, देशांतर्गत मागणी भागवण्यासोबतच निर्यातीच्या बाजारपेठेलाही प्रभावीरीत्या सेवा देण्यासाठी हे स्थान आदर्श ठरते.
जागतिक अनुभव, स्थानिक बांधिलकी
विनफास्ट भारतात आपला समृद्ध आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन येत आहे. कंपनीने यापूर्वी अमेरिका, कॅनडा, युरोप, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि मध्यपूर्व आशिया या बाजारपेठांमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला आहे. आज कंपनीची उपस्थिती तीन खंडांमध्ये पसरलेली असून, जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहन क्रांती घडविण्याच्या तिच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे.
विनफास्टने आपल्या मातृभूमी व्हिएतनाममध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे व त्या देशात अग्रगण्य वाहन निर्माता म्हणून स्थान मिळवले आहे. कंपनीने वेगवान प्रगती आणि नाविन्यपूर्णतेसाठी आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळवली आहे.

