पुणे :पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शैलेश काळे( दै. आज का आनंद), कार्यवाहपदी पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी) आणि खजिनदारपदी सुनीत भावे ( दै. महाराष्ट्र टाइम्स) यांची सोमवारी (दि. ८ सप्टेंबर ) बिनविरोध निवड करण्यात आली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी २२ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली. ऍड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यामध्ये निवडलेल्या विश्र्वस्तांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आज पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात)आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील (सकाळ) यांची पदसिद्ध विश्वस्तपदी याआधीच निवड आली आहे.नवीन विश्वस्तांची पदाधिकारी निवडीची सभा सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) मावळते अध्यक्ष शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आली. या सभेत नवीन पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मावळते कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे उपस्थित होते.

