पुणे-यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने विक्रमी वेळ गाठला आहे. तब्बल ३० तासांहून अधिक काळ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३१ तासांनंतर विसर्जन मिरवणुक संपली आहे. शेवटचा महाराष्ट्र्र तरुण मंडळाचा गणपती 4.30 टिळक चौकातून विसर्जेन घाटावर मार्गस्थ आहे. यावर्षी विक्रमी 3१ तास चालली आहे. दरम्यान, यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे.
पुण्यातील सर्व गणेश मंडळाणी सहकार्य केले. मोठा बंदोबस्त 12 दिवसांपासून लावण्यात आला होता. सगळा सोहळा शांततेत पार पडला. सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन. गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश आल्याचे मत यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाचं नाही. तर मधल्या वेळेत काही मंडळांचा मंडळांशी आक्षेप होता ते सोडवण्यात आलं. प्रत्येक मंडळांना योग्य वेळ मिरवणुकीसाठी मिळाला पाहिजे हि आमची भूमिका होती. उत्साहात मिरवणूक पार पडली पाहिजे हि भूमिका होती असे मत कुमार यांनी व्यक्त केले.
मानाच्या गणपतींचे विसर्जनाला गेला पूर्ण दिवस

मानाचा पहिला कसबा गणपती
-3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
-4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम-
4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
-4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
-तर दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक सायंकाळी 4 वाजता सुरू झाली..विसर्जन 8 वाजून 23 मिनिटांनी म्हणजेच 4 तास 23 मिनिटांनी झाले.भाऊ रंगारी गणपती पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.

