जागेच्या घुसखोरीचे अर्थकारण दडल्याचा काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारींचा आरोप
पुणे दि ५ सप्टे –
“मुठा नदी पात्रातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नदी – पाण्याची वहन क्षमता” एकीकडे कमी होत चालल्याने पुराचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे.
गणपतीच्या धामधूमीत व सुट्टी काळात” त्याचा फायदा उचलत, रातो – रात ‘नदी पात्रातील’ जागेची चोरी करून व निळे पत्रे लावून कब्जा मारण्याचा प्रकार पुढे आला आहे.
आपल्या पुर्वीच्या तक्रार अर्जांवर ‘मनपा प्रशासनाने’ कारवाई करून, “नदीपात्रातील अतिक्रमणे” काढलेल्या राडारोड्याचा पात्रातच् भराव करून, खाजगी वाड्यांच्या मागील मिळकतींची हद्द (नदीपात्रात शिरकाव करून वाढवून) बिल्डर’ला त्याचा लाभ करून देण्याचे अर्थकारण होत असल्याचा पुराव्यानिशी आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते व या भागातील माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी केला.
या संघर्षातूनच आपल्यावर खुसपट काढून, कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नात, तथ्यहीन आरोप करण्याचे व आपल्यावर नाहक शिंतोडे उडवण्याचे प्रकार देखील होत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
लकडी पुल ते भिडे पुल” नजीक (नारायण पेठेतील खाजगी वाडे व मिळकतींच्या नदी पात्रातील मागील बाजूस), पुणे मनपा’ने दगडी भिंत बांधण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आपल्या नगरसेवक कारकिर्दीतच केला होता.
मात्र नदी किनारीच्या काही मिळकती – वाड्यांची नदीपात्रातील बाजूस (काही महिन्यांपूर्वीच तेथील अतिक्रमणे काढल्याच्या) राडारोड्याच्या भरावाच्या आधारे, खाजगी जागांची हद्द वाढवण्याचे निंद्य प्रकार नुकताच घडत असल्याचे पुढे आले असून, पाट बंधारे विभाग व पुणे मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी केली.
‘नदी पात्रातील’ जागेची रातो – रात चोरी..! पत्रे लावून कब्जा..!
Date:

