पुणे दि. ५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्या निर्देशानुसार गठीत समितीमार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये १०० दिवसांच्या उपक्रमात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धी व सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक, गृहपाल, अधीक्षक, स्त्री अधिविक्षिका, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी “जनजाती गौरव दिन” या दिवशी करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घोडेगाव येथील गृहपाल श्रीमती रेणुका जाधव, हडपसर येथील गृहपाल श्रीमती अर्चना पवार, कराड येथील गृहपाल श्रीमती पुनम घायाळ, मांजरी रामय येथील गृहपाल श्री संजीव तोगरे, जुन्नर येथील गृहपाल श्री संतोष शिनमशिगरे, कोरेगाव पाट येथील गृहपाल श्री उदय महाजन, टोकावडे येथील मुख्याध्यापक श्री पोपट चव्हाण, कोते येथील मुख्याध्यापक श्री जगन्नाथ दराडे, मुथाळणे येथील मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दरेकर व असाणे येथील मुख्याध्यापक श्री राजेंद्र आंधळे यांचा समावेश आहे.
तसेच सोमतवाडी येथील स्त्री अधिविक्षिका श्रीमती अंकिता रजपूत, राजपुर येथील स्त्री अधिविक्षिका श्रीमती रेखा मोतेवाड, बोरबेट येथील स्त्री अधिविक्षिका श्रीमती मेघा भोपळे, आहुपे येथील अधीक्षक श्री लक्ष्मण मगर, टोकावडे येथील अधीक्षक श्री प्रमोद चोखांदे, सोमतवाडी येथील उच्च माध्यमिक शिक्षक श्री गणेश गोडसे, गोहे येथील श्री संजय जोशी, सोमतवाडी येथील श्री दत्तात्रय डुकरे, घोडेगाव येथील माध्यमिक शिक्षिका श्रीमती वैशाली कांबळे, खटकाळे येथील श्री शरद लोंढे, वडेश्वर येथील श्री संजय शिनकम, राजपुर येथील श्री सचिन लांडे, आहुपे येथील श्री शरद भागीत, तेरांगण येथील पदवीधर प्राथमिक शिक्षिका श्रीमती अर्चना कांबळे, घोडेगाव येथील श्रीमती शक्ती टोपे, शिखरेश्वर येथील श्री कैलास गारे, मुथाळणे येथील श्री गौतम शिंदे, घोडेगाव येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुशांता बोंबले, टोकावडे येथील श्री सुशांत शिंदे, वडेश्वर (श्रृंखला क्षेत्र) येथील श्री सुरेश गोगावले, मुथाळणे (कला क्षेत्र) येथील श्री गणेश रोकडे, गोहे (साहित्य क्षेत्र) येथील श्री तान्हाजी बोऱ्हाडे, राजपुर येथील श्री मोहन वाघमारे, कुरांजी येथील श्री गणेश भोसले, खटकाळे येथील श्री योगेश गवारी तसेच सोनावळे येथील श्री सोमनाथ गुंड यांचा गौरव होणार आहे.

