मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून IPS अधिकारी करत असलेल्या कारवाई बाबत संबधित महिला अधिकाऱ्याला केलेल्या फोन बद्दल विरोधकांतून संताप व्यक्त होत असताना अजितदादांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी या अधिकाऱ्यांची कागदपत्रे तपासा असे पत्र आयोगाला दिल्याने आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या आहेत त्यांनी ट्वीट करत हा संताप व्यक्त केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांच्या पत्रावर अंजली दमानिया एका पोस्टच्या माध्यमातून त्या म्हणाल्या की, ‘हा काय फालतूपणा आहे ? अमोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले? अंजना कृष्णाची चौकशी ? का ? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.’

