मुंबई- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून फोन करून विचारणा केल्याच्या घटनेनंतर आता या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करणारे पत्र आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या या नात्याने, मी तुम्हाला विनंती करतो की अंजना कृष्णा आयपीएस यांनी सादर केलेल्या ओळखपत्र, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी एक शंका उपस्थित करण्यात आली आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की याची सविस्तर चौकशी करून, त्याची सत्यता सुनिश्चित करावी आणि संबंधित विभागांची योग्य माहिती प्रदान करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांच्या या पत्राचा उद्देश स्पष्ट आहे. आताच या अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करावी त्यांना का वाटते आहे ? हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असे मानले जात आहे.

