Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदींची घोषणा पायदळी तुडविली महाराष्ट्रातल्या मंत्र्याने,स्वदेशीचा नारा म्हणजे लोका सांगे ब्रम्ह ज्ञान ..

Date:

मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२५
RSS आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी चा नारा कायम दिला आहे. ट्रम्प यांच्या अलीकडील भारताबाबतच्या व्यवहारानंतर तर मोदी यांनी स्वदेशीची घोषणा चालविली आहे पण हि घोषणा महाराष्ट्रातल्या त्यांच्याच सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेची टेसला कंपनीची सर्वात महागडी मोटार खरेदी करत आणि शिवाय सोशल मिडिया वरून दवंडी पिटवत पायदळी तुडवली असल्याचे दाखवून दिले आहे. यावरून आता विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष करायला सुरुवात केली आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यांनी म्हटले आहे कि ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली! शांतम् पापम्! शांतम् पापम्! लोकां शिकवे तत्वज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण!भाजपाने यावर आपली विशेष टिपण्णी द्यावी. हे पंतप्रधानांच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे हे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून? असे प्रश्न उपस्थित करून भाजपाने यावर विशेष टिपण्णी करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत पुढे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने नोटीस बजावली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देताना म्हणाले आहेत की, पैसा काळा असो की गोरा असला तरी चालेल, त्यामुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला ही कार घेतली, त्यासाठी दिलेले पैसा काळा होता का गोरा, हा प्रश्न आता काला धन नावाने बोंब ठोकणाऱ्या नरेंद्र मोदींनीच संपवला आहे, त्यामुळे ही अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे उत्तर गुलदस्त्यात राहील. मोदींनी परदेशी पैशात भारतीयांचा घाम मिसळला असला पाहिजे असेही म्हटले होते परंतु टेस्ला गाडी तर पूर्णपणे आयात केलेली आहे, त्यात भारतीयांचा घाम ही नाही.
कालपर्यंत माय फ्रेंड डोलान्ड ट्रंप, नमस्ते ट्रंप, अबकी बार ट्रंप सरकार, हाऊडी ट्रंप म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी नारा बदलून सध्या हिंदी चिनी भाई भाई चा नारा दिला आहे याचीही जाणीव शिवसेनेला नाही. त्यामुळे महायुती की जेल में सुरंग लावण्याचे काम आता मित्रपक्षच करत आहेत असा मिश्किल टोला सावंत यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असला तरी ते स्वतः मात्र विदेशी आणि महगाड्या वस्तू वापरतात. नरेंद्र मोदी जर्मन बनावटीची BMW कार वापरतात, इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात, इटालियन कंपनीचे घड्याळ, कॉपर व्हिजन या अमेरिकन कंपनीचा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात. एवढेच काय ते खातात ते मशरूमही विदेशातून येते अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा नारा म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण”, असा प्रकार आहे असे सचिन सावंत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...