मुंबई-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भारतातील पहिली टेस्ला मॉडेल वाय कार खरेदी केली. याच वर्षी 15 जुलै रोजी उद्घाटन झालेल्या ‘टेस्ला एक्स्पिरियन्स सेंटर’ मधून ही कार डिलिव्हर करण्यात आली. या वेळी सरनाईक म्हणाले की, “टेस्ला ही एक चांगली कार आहे. मी ती पूर्ण पैसे देऊन आणि सवलती शिवाय खरेदी केली आहे. जुलैमध्ये उद्घाटन दरम्यान, सरनाईक यांनी कार खरेदी करण्यासंदर्भात मत व्यक्त केले होते. आपण ही कार नातवाला भेट देणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
परिवहन मंत्री आणि भारतातील पहिल्या टेस्ला कारचे मालक प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘मी माझ्या नातवाला टेस्ला भेट दिली आहे… कार घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण राज्याचे परिवहन मंत्री ईव्ही घेत आहेत हा संदेश देण्यासाठी मी ही कार खरेदी केली. पुढील 10 वर्षांत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत. हे आपल्या सरकारचे स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी, परिवहन मंत्री म्हणून मी ही कार खरेदी केली जेणेकरून लोकांना अधिकाधिक ईव्ही घेण्याची प्रेरणा मिळेल.’
10 वर्षांत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर यावीत – प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘भारताची पहिली टेस्ला कार, मॉडेल वाय खरेदी केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो. महाराष्ट्र सरकार नेहमीच पर्यावरणपूरक कार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करते. पर्यावरणपूरक वाहने शक्य तितकी वापरावीत यासाठी मी जनजागृती करू इच्छितो. पुढील 10 वर्षांत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर यावीत यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परिवहन विभाग इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करोय. आम्ही अशा वाहनांच्या मालकांनाही सुविधा पुरवल्या आहेत… मी माझ्या नातवासाठी ही कार खरेदी केली आहे, जेणेकरून जनजागृती होईल. जर कार खरेदी करण्याची क्षमता असलेले पालक त्यांच्या मुलांना या कारमध्ये शाळेत सोडतील तर पर्यावरणपूरक कारबद्दल जनजागृती होईल; मुले यावर चर्चा करतील आणि लोक अधिकाधिक पर्यावरणपूरक कार खरेदी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरनाईक आणि महाराष्ट्र सरकारचे एक शाश्वत पाऊल – पूर्वेश सरनाईक
युवा सेनेचे कार्याध्यक्ष आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र, पूर्वेश प्रताप सरनाईक म्हणाले की, “हे मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र सरकारचे एक शाश्वत पाऊल आहे कारण हे भविष्य आहे आणि आपण इलेक्ट्रिक वाहनांना अधिक महत्त्व दिले पाहिजे…”
टेस्ला मॉडेल Y ची किंमत 60 लाखांपासून
मंत्री सरनाईक यांनी म्हटले की, “ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने एक नवीन टप्पा – टेस्लाचे घरी स्वागत करताना अभिमान आहे!” इलेक्ट्रिक वाहन (EV) या दिग्गज कंपनीने मध्यम आकाराच्या SUV, टेस्ला मॉडेल Y ची किंमत जवळजवळ ₹60 लाखांपासून सुरू केली आहे. सध्या, मॉडेल Y हे भारतात उपलब्ध असलेले एकमेव मॉडेल आहे आणि ते दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 60 लाखांपासून सुरू होणारे रीअर-व्हील ड्राइव्ह आणि 68 लाखांपर्यंत सुरू होणारे लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह आहे. मंत्री सरनाईक यांनी नियमित RWD मॉडेल खरेदी केले आहे की लाँग-रेंज RWD मॉडेल खरेदी केले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य
- टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.
- Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते.
- टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते.
- नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.
- Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.
- Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.
‘टेस्ला’च्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
स्टेल्थ ग्रे-
- पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)
- डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)
- ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)
- क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)
- अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त

