Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मर्सिडीज-बेंझ इंडियाकडून ‘ड्रीम डेज’ या उत्सवी मोहिमेची घोषणा

Date:

: एक्स-शोरूम किमतीच्या केवळ १ टक्का इतक्या रकमेपासून सुरू होणारे फायदेशीर
ईएमआय, की-टू-की प्रोग्रॅम, ट्रेड-इन बेनिफिट्स, सिझनल पेमेंट प्लॅन आणि जलद अपग्रेडसाठी शून्य डाऊनपेमेंट –

या सर्व सुविधा या उत्सवी हंगामात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करतील.

“भारत हे स्वप्नांवर उभे राहिलेले राष्ट्र आहे. स्टार्टअपचे संस्थापक असोत, उद्योजक असोत किंवा अनुभवी कार्यकारी
अधिकारी असोत, इथे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आकांक्षेप्रमाणे आलिशान आयुष्य जगण्याचा, ते
अनुभवण्याचा अधिकार आहे. ग्राहकांच्या या स्वप्नांची पूर्तता करण्याची आमची कटिबद्धता ड्रीम डेज या उत्सवी
मोहिमेतून व्यक्त होत आहे. यासाठी आम्ही सोयीस्कर व खास वित्तीय योजना उपलब्ध करून देत आहोत. त्यातून
त्यांना खरेदीचा निर्णय घेण्यात आधार मिळेल. आम्हाला खात्री आहे की या वित्तीय योजनांमुळे ग्राहकांना मोठा
लाभ होईल आणि येत्या सणासुदीच्या काळात बाजारात उत्सवी वातावरण व सकारात्मक मानसिकता निर्माण
होईल.” इति संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज-बेंझ इंडिया
 ‘ड्रीम डेज’ मोहिमेद्वारे मर्सिडीज-बेंझ लक्झरी कार ग्राहकांच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद देत, त्यांना आपली
स्वप्नातील मर्सिडीज-बेंझची मालकी मिळवण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
 दि. २ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात कार्यान्वित असणारी ही मोहीम, ग्राहकांना आकर्षक सुविधांसह
आपली स्वप्नातील मर्सिडीज-बेंझ मिळवण्याची संधी देईल.
 देशभरातील परफॉर्मन्स कार चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, निवडक एएमजी पोर्टफोलिओवर मर्यादित
कालावधीसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील.
 संपूर्ण भारतातील वितरकांकडे ग्राहकांसाठी खास रचलेले अनुभव.
 ‘ड्रीम डेज फेस्टिव्हल’ नावाचा प्रत्यक्ष ग्राहक कार्यक्रम चंदीगड, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि
कोची या ६ महत्त्वाच्या बाजारपेठांत मर्सिडीज-बेंझ इंडिया आयोजित करणार आहे.
 ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी मर्सिडीज-बेंझने देशभरात ग्राहक सेवा क्लिनिक
सुरू केले आहे.
पुणे : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी कार बनविणाऱ्या मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनीने आज ‘मर्सिडीज-बेंझ
ड्रीम डेज’ या बहुप्रतीक्षित उत्सवी जाहिरात मोहिमेची घोषणा केली. “ड्रीम्स ऑफ इंडिया अँड ड्रीमर्स” ही संकल्पना
साजरी करण्यासाठी ही जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली असून, तिची सुरुवात २ सप्टेंबर रोजी होईल. या
मोहिमेतील विशेष आकर्षणे ऑक्टोबरमधील उत्सवी महिन्यांत अनुभवायला मिळतील.मर्सिडीज-बेंझ ड्रीम डेज ही एक सर्वसमावेशक ३६० अंशांची उत्सवी मोहीम असून, ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर
मर्सिडीज-बेंझच्या आलिशान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची हमी देण्याच्या दृष्टीने ती रचण्यात आली आहे. यामध्ये
नाविन्यपूर्ण आर्थिक सुविधा, प्रभावी एटीएल मोहिमा आणि प्रत्यक्ष स्थळांवर केंद्रित उपक्रम यांचा संगम असेल.
ग्राहकांसाठी या मोहिमेत नाविन्यपूर्ण आर्थिक योजना देण्यात आल्या आहेत. त्यांतून त्यांना आपली स्वप्नातील
मर्सिडीज-बेंझ खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. अशा खास आखलेल्या उपक्रमांमुळे ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण
होईल आणि बाजारपेठेत सकारात्मक वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा आहे. ही मोहीम नव्याने विकसित होत
असलेल्या आणि भविष्यातील वाढीची मोठी क्षमता असलेल्या बाजारपेठांतील ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण
करण्यावरही केंद्रित आहे. अशा बाजारपेठांमध्ये मर्सिडीज-बेंझ आपली उपस्थिती सातत्याने वाढवत आहे.
‘ड्रीम डेज’ – मर्सिडीज-बेंझकडून नाविन्यपूर्ण मालकी उपाय
व्हॅल्यू अ‍ॅडेड ओनरशिप :
‘मर्सिडीज-बेंझ’च्या एन्ट्री व कोअर सेगमेंटसाठी विविध आर्थिक योजना तयार करण्यात आल्या आहेत. एक्स-शोरूम
किमतीच्या एक टक्का इतक्या कमी रकमेपासून सुरू होणाऱ्या आकर्षक ईएमआय सुविधा, फायदेशीर आरओआय
आणि कमी डाऊन-पेमेंट यांचा लाभ ग्राहकांना घेता येईल. जे ग्राहक प्रथमच मर्सिडीज-बेंझ कुटुंबाचा भाग बनत
आहेत, त्यांच्यासाठी ‘ड्रीम डेज’ मोहिमेअंतर्गत सध्याच्या गाडीच्या ट्रेड-इनवर ‘वेलकम बेनिफिट्स’ मिळतील.
त्यामुळे ते आपल्या प्रिय मर्सिडीज-बेंझच्या अधिक जवळ येतील.

सोयीस्कर पेमेंट योजना :
‘मर्सिडीज-बेंझ’च्या ग्राहकांसाठी खास तयार केलेली ‘सिझनल पेमेंट प्लॅन’ सुविधा उपलब्ध आहे. यात ग्राहकांना
हप्त्यांच्या स्वरूपात ईएमआय भरण्याऐवजी, मालकी हक्काच्या कालावधीत सोयीच्या वेळी (उदा. बोनस / डिव्हिडंड
मिळण्याचे महिने) एकरकमी भरण्याची संधी मिळते. यामुळे दर महिन्याला डोईजड ईएमआय भरण्याची गरज
राहत नाही आणि अनियमित स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नामध्येदेखील ग्राहकांना मर्सिडीज-बेंझ मिळवणे सोपे होते.
की-टू-की प्रोग्राम : शून्य डाऊनपेमेंटमध्ये नवीन कार अपग्रेड
‘मर्सिडीज-बेंझ’च्या ‘एस-क्लास’सारख्या काही निवडक मॉडेल्ससाठी ही योजना आहे. यामध्ये ग्राहक आता आपली
स्वप्नातील कार खरेदी करू शकतात आणि २४ ते ३६ महिन्यांत शून्य डाऊनपेमेंटसह नवीन व्हेरिएंटमध्ये अपग्रेड
करू शकतात. हा ‘की-टू-की प्रोग्रॅम’ हा एक अनोखा उपक्रम असून, त्यातून ग्राहकांना फक्त ४ वर्षांत दोन मर्सिडीज-
बेंझ कार घेण्याची संधी मिळू शकते. या योजनेत ही अपग्रेडची संधी एकदा मोफत मिळते आणि ग्राहकांना
कंपनीकडे उपलब्ध असलेली नवीन मॉडेल्स चालवण्याचा लाभ मिळतो.
ग्राहकसेवेसाठी देशव्यापी क्लिनिक्स :
ग्राहकांशी नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी ‘मर्सिडीज-बेंझ’ने विविध भागांत
सर्व्हिस क्लिनिक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘मर्सिडीज-बेंझ’चे प्रशिक्षित अभियंते प्रत्यक्ष ठिकाणी भेट
देऊन ग्राहकांशी संवाद साधतील, वाहनांशी संबंधित शंका दूर करतील आणि अत्याधुनिक डायग्नॉस्टिक्स व तज्ज्ञ
पातळीवरील देखभाल करून वाहनांची उत्तम काळजी घेतील.
ड्रीम डेज फेस्टिव्हल :ड्रीम डेज मोहिमेद्वारे मर्सिडीज-बेंझ इंडिया ग्राहकांच्या स्वप्नातील मर्सिडीज-बेंझ मिळवण्याच्या इच्छेला अधिक बळ
देत आहे. नवीन स्वप्न पाहणारे आणि यश मिळवणारे ग्राहक आपल्या शहरांतून या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
ऑक्टोबर २०२५पासून मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रथमच ‘ड्रीम डेज फेस्टिव्हल’ हा विशेष महोत्सव सुरू करीत आहे.
चंदीगड, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि कोची या सहा प्रमुख शहरांत दोन दिवस चालणाऱ्या या
महोत्सवात ‘मर्सिडीज-बेंझ’च्या सर्व श्रेणीतील गाड्या – सेदान्स, एसयूव्ही, बीईव्ही, एएमजी आणि आयकॉनिक जी-
क्लास – एकत्र पाहण्याची संधी ग्राहकांना मिळेल.
दररोज ३०० हून अधिक सहभागींना आकर्षित करून घेणाऱ्या’ मर्सिडीज-बेंझ ड्रीम डेज फेस्टिव्हल’मध्ये एक अत्यंत
काळजीपूर्वक तयार केलेला ड्रायव्हिंग ट्रॅक असणार आहे. कंपनीच्या एसयूव्ही आणि सेदान कार यांची तांत्रिक ताकद
व बहुपयोगी क्षमता या ट्रॅकवर स्पष्ट होईल. ग्राहक साइड स्लोप, आर्टिक्युलेशन, स्टेप्ड इन्क्लाईन, स्मूथ डिसेंट, जी-
टर्न, स्लॅलम आणि इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारख्या विविध गतिमान भूभागांवर आणि सिम्युलेशन्सवर गाडी चालवू
शकतील. या महोत्सवात ‘बर्मेस्टर साउंड एक्स्पिरियन्स’सारख्या खास उपक्रमांचाही समावेश आहे. ब्रँड आणि
त्याच्या ग्राहकांमधील भावनिक नाते अधिक घट्ट करण्यासाठी हे उपक्रम रचण्यात आले आहेत. या महोत्सवाचा
समारोप एका खास सनडाऊनर पार्टीने केला जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...