सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तीचे विसर्जन
मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे
१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय तसेच ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था
एकूण १५ घाटांकरिता रोजंदारी वरील एकूण ९० जीवरक्षक,
विसर्जन घाट व हौदांवर एकूण ३४४ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे
पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व सरांवरून जय्यत तयारी करण्यात येत असून याकरिता मनपाचे विविध विभाग क्षेत्र कार्यालयाने आपल्या स्तरावर जय्यत तयारी चालू केलेली आहे. नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती ,रंगरंगोटी, लोखंडी टाक्या ,निर्माल्य कलश विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरूपाच्या कामाबरोबर सार्वजनिक स्वच्छता मिरवणूक मार्गावरील स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्लीपिंग कंटेनर ,निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी ,विसर्जन घाटावर अग्निशमन दलाचे कर्मचारी व्यवस्थापन, घाटावर औषध फवारणी नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद लोखंडी टाक्यांची सोय करण्याचे काम चालू आहे. त्याच बरोबर जीव रक्षकांच्या नियुक्ती, दोन पाळ्यांत अधिकारी -कर्मचारी यांच्या नियुक्ती, सुरक्षा यंत्रणा ,विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिनी यांचे गळती ठिकाणी त्वरित दुरुस्ती करणे करिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपणाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे शौचालयांची स्वच्छता सूचनाफलक आदी स्तरावरून तयारी चालू आहे.
विविध क्षेत्रीय कार्यालयाकडे विसर्जन व्यवस्था ,हौद, टाक्या यांच्या सुविधांची कामे चालू असून आणि ती टप्प्यात आलेली आहेत.
सर्व घाटांच्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता बसण्यासाठी खुर्च्या , टेबल, मांडव ,हिरकणी कक्ष ,विद्युत कॅमेरे व्यवस्था करण्याचे काम चालू आहे दुरुस्ती करून त्यात स्वच्छ पाणी भरण्यात येणार आहे. सदर घाटांवर दैनंदिन स्वच्छता करण्यात येत असून निर्मल कलश ठेवण्याची जागा व्यवस्थित करण्यात येणार आहे .तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व घाटांवर तीन पाळ्यांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी जीव रक्षक ,सुरक्षारक्षक व अग्निशमनचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत
अग्निशमन विभागाकडील माहिती
श्री गणेशोत्सवाचे अनुषंगाने अग्निशमन दला मार्फत श्री गणेश विसर्जनाचे वेळेस नदी पात्रामध्ये गणपती विसर्जनाकरिता आलेल्या नागरिकांचा / भाविकांचा बुडीत होण्याचा धोका लक्षात घेता, सन १९९२ पासून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नदीकाठच्या खालील नमूद विसर्जन घाटांवर दुर्घटना घडू नये म्हणून अग्रिशमन दलाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्रिशमन दलाकडील फायरमन सेवक तसेच त्यांच्या मदतीला जीवरक्षकांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात येते.
१. अमृतेश्वर घाट २. पुलाची वाडी ३. नटराज सिनेमा जवळ ४. ओंकारेश्वर ५. वृद्धेश्वर ६. गरवारे कॉलेज, ७. पांचाळेश्वर ८. अष्टभुजा मंदिर ९. संगम घाट १०. विठ्ठल मंदिर ११. बाप्पू घाट १२. ठोसरपागा घाट
१३. चिमा उद्यान येरवडा १४. दत्तवाडी घाट १५. वारजे (स्मशानभूमी)
वरील नमूद प्रत्येक घाटावर नागरीकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन अग्रिशमन दलाकडून २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येतो. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे अग्निशमकादलाकडून व्यवस्था करण्यात येते-
१. गणपती विसर्जन घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोरखंड बांधण्यात येतो. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास या दोरखंडास धरून आपला जीव वाचवू शकते.
२. नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, नदीच्या काठावर पुणे मनपा यांचे कडून बांधण्यात / ठेवण्यात आलेल्या हौदामध्ये गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बऱ्याचदा दलाकडील जवान व जीवरक्षक यांचेकडून गणपती विसर्जन करण्यात येते.
३. दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ अखेर गणेशोत्सव कालावधीत अग्निशमन दलाकडे जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध राहाणेचे दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात येतात.
४. प्रत्येक गणेश विसर्जन घाटावर अग्रिशमन अधिकारी यांचे नियंत्रणाखाली दुपारी ०१:०० ते रात्री ०९:०० या वेळेत अग्रिशमन दलाकडील प्रत्येकी ०१ फायरमन असे एकूण १५ फायरमन मेवक व तिन्ही पाळयांमध्ये प्रत्येकी ०२ या प्रमाणे एकूण १५ घाटांकरिता रोजंदारी वरील एकूण ९० जीवरक्षक, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथे ३० राखीव जीवरक्षकांची गणेशोत्सव काळात तात्पुरती नेमणूक करण्यात येते.
५. जीवरक्षक नेमलेल्या प्रत्येक घाटावर जादा दोरखंड व लाईफ जॅकेट यांची व्यवस्था केली जाते. नेमलेले जीवरक्षक रात्रीचे अंधारातही दृष्टीस पडण्याच्या उद्देशाने सदर जीवरक्षकांना ट्रैफिक व्हेस्टम् देण्यात येतात.
६. अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाचा अंतिम दिवस असल्याने व या दिवशी शहरातून गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक निघत असल्याने, मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणुकी संबंधीची माहिती मिळविण्यासाठी मिरवणूक मार्गावर १) पुणे महानगरपालिका स्वागत कक्ष, टिळक चौक २) नटराज सिनेमा गृहाचे मागे या दोन ठिकाणी अग्रिशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात येतात. तसेच टिळक चौक या ठिकाणी अग्रिशामक वाहन व कर्मचारी यांची नेमणूक केली जाते.
७. पुणे अग्निशमन दल आणि एफ.एस.ए.आय. या संस्थेच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप व इतर बाबींच्या सुरक्षिततेच्या संबंधीत प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देऊन, जनजागृती करणेबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे.
“विद्युत सुरक्षा पाळा आणि जीवित हानी टाळा”
नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेमार्फत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरिता दिवाबत्तीची यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. सदर दिवाबत्ती, प्रकाश व्यवस्थेची देखभाल-दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यामार्फत पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरातील सर्व स्ट्रीट लाईट पोलची तपासणी करण्यात आली आहे, तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या कामांमध्ये काही उणिवा त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास म्हणजेच पोलला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात तक्रार नोंदविण्यात यावी.
दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ दरम्यान श्रीगणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्रगणेशोत्सवासाठी तात्पुरती विजजोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व श्रीगणेश मंडळांनी याचा लाभ घेऊन अनधिकृत वीज जोडणी टाळावी, तसेच विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी टाळा. तरी सर्व श्रीगणेश मंडळांनी पुणे महानगरपालिकेस सहकार्य करून व अधिकृत वीजजोडणी घेऊन श्रीगणेशोत्सव आनंदात साजरा करावा. त्याचप्रमाणे इमारती व दिवाबत्तीच्या खांबांमधून मनपाकडून प्रकाश व्यवस्थेकरिता श्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील बाबींचे कटाक्षाने पालन करावे-
• नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये.
• पथदिवे खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये.
• पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये.
• जनावरे पथदिवे खांबांना बांधू नयेत.
• जंक्शन बॉक्स वर पाय ठेवून खांबावर चढू नये.
• कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधू नयेत.
• बांधकामांमध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नयेत. खांबांना फ्लेक्स, होर्डिंग बांधू नये.
• कोणत्याही प्रकारची केबल तार पथदिवे खांबावरून ओढू नये.
• विविध खोदाईमुळे जमिनीवर उघड्यावर आलेल्या भूमिगत केबल्सजवळ जाऊ नये, अथवा त्यांना स्पर्श करू नये.
वरील निर्देशित प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारवी जीवित अथवा वित्तहानी झाल्यास पुणे महानगरपालिका अशा दर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधित नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिका अंतर्गत दरवर्षी श्री गणेशोत्सव कालावधीत विसर्जन घाटांवर व कृत्रिम विसर्जन हौदांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सुलभतेसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतात. त्याअनुषंगाने, सदर कालावधीत पुणे महानगरपालिका विद्युत विभागामार्फत खालील बाबीची कार्यवाही करण्यात येणार आहे-
१) तात्पुरती प्रकाश व्यवस्था करणे
पुणे शहरामध्ये एकूण ४२९ विसर्जन घाट व हौद असून सदर ठिकाणी ३७०८ एल ई डी दिवे, १९७ जनरेटर सेट, ३८८ स्पीकर सेट, १९२ चौ. फुट एल ई डी स्क्रीन बनविण्याची कामे करण्यात येणार आहेत.
रस्त्यावर असलेले पथदिवे तसेच तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आलेले दिवे रात्रभर चालू राहतील याची दक्षता घेण्यात येणार आहे.
२) तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विसर्जन घाट व हौदांवर एकूण ३४४ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.गर्दीचे आणि संवेदनशील ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतीन याची दक्षता घेण्यात येणार आहे.पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ १,२,३,४ व ५ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.>विद्युत विषयक बाबींकरिता पुणे महानगरपालिका विद्युत विभागाकडील अधिकारी यांची नावे, हुद्दा व मोबाईल क्रमांक याबाबतची यादी सोबत संलग्न करण्यात येत आहे.
- गणेशोत्सव २०२५ व गणेश विसर्जनाकरिता पथ विभागाचे नियोजन/तयारी
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक उत्सवा पैकी एक मानला जातो. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवाचे दहा दिवस शहरातील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याचे विचारात घेऊन, पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने पथ विषयक विविध देखभाल-दुरुस्तीची प्रमुख कामे पूर्ण केलेली असून किरकोळ स्वरुपाची कामे सुरु आहेत. पुणे शहराच्या उपनगरां बरोबरच पुण्याच्या मुख्यतः मध्यवती गावठाणात भागात पूर्वपार सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरा असलेल्या या गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहील, नागरिकांना अडथळे येणार नाहीत आणि आपत्कालीन सेवा कार्यक्षम राहील या बाबत पुणे मनपाच्या पथ विभागामार्फत काळजी घेण्यात आलेली आहे.
गणेशोत्सव २०२५ करिता पथ विभागामार्फत करण्यात आलेले नियोजन व तयारीच्या काही ठळक बाबी:-
गणेशोत्सव सन २०२५ च्या अनुषगाने संपूर्ण शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांचे मंडप आणि परिसर तसेच सार्वजनिक कार्यक्रम स्थळे इ. ठिकाणी आणि मिशन ३२ अंतर्गत येणारे रस्ते यांची देखभाल-दुरुस्ती विषयीची बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे काही अंशतः सुरु आहेत.
पुण्याच्या मध्यवर्ती गावठाणात भागातील गणेशोत्सवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले व मनपाच्या मिशन ३२ या रस्त्यांच्या यादीत समाविष्ट रस्त्यांचे मनपाच्या पथ विभागामार्फत रिसरफेसिंग, दुरुस्ती आणि पंचवर्क विषयक कामे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत.
पुण्याच्या मध्यवती गावठाणात भागातील प्रमुख रस्ते १) महाराणा प्रताप रस्ता- कस्तुरी चौक ते घोरपडे पेठ पोस्ट ऑफिस २) गणेश रस्ता ३) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शनिवार वाडा ते रामेश्वर चौक ४) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रामेश्वर चौक ते जेधे चौक ५) लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौक ते बेलबाग चौक ६) लक्ष्मी रस्ता बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौक ७) टिळक रस्ता ८) कुमठेकर रस्ता ९) बाजीराव रस्ता १०) केळकर रस्ता ११) शास्त्री रस्ता १२) नेहरू रस्ता १३) शंकरशेठ रस्ता. हे रस्ते सुस्थितीत करण्यात आलेले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मागणीनुसार मंडप डेकोरेशनच्या परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरून घेण्यात आले.विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर विशेष पॅचवर्क आणि डांबरीकरण कामे करून घेण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथ विभागा मार्फत “पीएमसी रोड मित्र”हे रस्त्यावरील खड्डया बाबत नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन अॅप चा प्रारंभ करण्यात आलेला आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत तक्रार नोंदवता यावी म्हणून अॅपचा वापर करता येणार आहे. तसेच PMC online complaint, आपत्कालीन तक्रार निवारण, टोलफ्री हेल्पलाईन नंबर इ तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध असून, यावर पी.एम.सी कडून त्वरित कार्यवाही करण्यात येते.विसर्जन मार्गावरील रस्त्याचा कॅरेजवे पदपथ, पावसाळी वाहिनीचे चेम्बर्स, ड्रेनेज चेम्बर्स इत्यादी सुस्थितीत करण्यात आलेले असून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही या पद्धतीने दुरुस्ती कामे करून घेण्यात आलेली आहे.पुणे शहरात गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे शहराच्या मुख्यतः मध्यवर्ती भागातील काही वॉटर लॉगिंग स्पॉट विचारात घेऊन तेथे पाणी साठणार नाही या करिता आवश्यक उपाययोजना करून घेण्यात आलेल्या आहेत.
गणेशोत्सवाचा अनुषंगाने श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यत पथ विभागामार्फत रस्ते देखभाल दुरुस्ती व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांचे मार्फत गणेश उत्सव काळात तात्काळ रस्ते देखभाल दुरुस्ती विषयीच्या तक्रारीची दखल घेऊन निराकरण करण्यात येणार आहेत.
पुणे महानगरपालिका मोटार वाहन विभागकडून गणेशोत्सवाच्या काळात खालीलप्रमाणे सेवा पुरविण्यात येतात.
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य संकलन व वाहतूक करण्याकरिता विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार ३.८ क्यु.मी. क्षमतेचे कंटेनर पुरविण्यात येतात (एकूण कंटेनर १०८)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत दुसऱ्या दिवसापासून गणेशमूर्तींचे विसर्जन हौदामध्ये विसर्जन झालेनंतर मूर्तीची वाहतूक करणेसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार ट्रक संवर्गातील मनपा मालकीची व ठेकेदाराकडील वाहने पुरविण्यात येतात (एकूण वाहने ७६०)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन झाले नंतर वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जन करणेसाठी टिपर व पोकलेन मशीन पुरविण्यात येतात. (एकूण पोकलेन २)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन झाले नंतर वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जन करणेसाठी जेसीबी मशीन पुरविण्यात येतात. (एकूण ४ जेसीबी)
• क्षेत्रीय कार्यालयाकडील विद्युत विभागाचे मागणीनुसार इलेक्ट्रिक लेंडर (शिडीगाडी) वाहने पुरविण्यात येतात. (७ वाहने)
• वाघोली येथील खाणीवर गणेशमूर्ती पुनर्विसर्जन कामासाठी आरोग्य निरीक्षक व मनपा बिगारी सेवक यांची ने-आण करणे कामी २ टेम्पो ट्रॅव्हलर, २ सहाआसनी वाहने गणेशोत्सवाच्या कालावधीत पुरविण्यात येतात.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पूणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पूर्वतयारी.
सालाबादप्रमाणे सन २०२५ मधील सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन मा.महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव २०२५ कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय तसेच ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २४१ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर www.pmc.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहोत.
गणेशोत्सव २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXISTसंस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी, जिवित नदी या स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, गुत्यो किता त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशाकुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते. ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात येणार आहे. या गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी, मा.प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा. पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले आहे.वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहायगणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करण्यात येणार आहे.गणेशोत्सव सन २०२४ मध्ये १.०१,२८९ गणेश मूर्ती बांधलेल्या हौदात, २,८२,६०४ गणेश मूती लोखंडी टाक्यांत, १,७६,०६७ गणेशमूर्ती दान इतके मूर्ती विसर्जन झालेले होते. तसेच एकूण ७,०६,४७८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते.गणेशोत्सव सन २०२४ मध्ये प्रतिदिन ३८६ पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात आले होते. यावर्षी एकूण ५५४ पोर्टेबल टॉयलेटची मागणी क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात आली असून त्यानुसार आवश्यक पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात येत आहेत
आरोग्य विभागाकडील माहिती
लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने आरोग्य विभागाने व्यापार तयारी केली आहे यासाठी विसर्जन मार्ग व घाटांवर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहे. शनिवारी महानगरपालिकेला सुट्टी असले तरी आरोग्य विभागातील जवळपास ३०० कर्मचारी अधिकारी व डॉक्टर कार्यरत राहून आरोग्य सेवा देणार आहेत . शहरातील विविध भागात १०८ क्रमांकाच्या व महानगरपालिकेच्या मिळून एकूण 30 रुग्णवाहिका तैनात राहणार असून त्या घटनास्थळी तातडीने पोहोचून रुग्णांना दवाखान्यात हलवण्याचे काम करतील.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान १५ वैद्यकीय पथके सज्ज ८० डॉक्टर २०० कर्मचारी कार्यरत आहे चौकात तीन आयसीयू बेडसह आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहे पालिकेचे बारा दवाखान्यात ओपीडी सुरू आहे कमला नेहरू रुग्णालयातील दहा खाटा राखीव शहरात एकूण ३० रुग्णवाहिका सज्ज आहेत.
• प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो पुणेकरांनी नदी किंवा जलस्त्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ कृत्रिम हौद, एकूण २८१ ठिकाणी ठेवलेल्या ६४८ लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे तसेच ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश- कंटेनर ठेवण्यात आले आहेत. मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिवसभरात शहरात १ लाख ३२ हजार ७२८ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे.

