पुणे -पुणे मल्याळी फेडरेशनच्या ‘‘ओणम सेलिब्रेशन २०२५’’ ला आज, ४ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरुवात झाली. या समारंभाचे उद्घाटन पुणे रेल्वे पोलीस अधिक्षक आस्वनी सानप यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास पुणे रेल्वेचे आयआरटीएस वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. रामदास भिसे, आणि वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ए. के. पाठक हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली पारंपारिक ओणम पूकलम (फुलांनी सजवलेली रांगोळी). दुसरे आकर्षण म्हणजे राजा महाबलीची ऐतिहासिक पोशाखातली भव्य मिरवणूक आणि कलाकारांच्या गटाने पारंपारिक केरळ चेंदमेलमसह काढलेली मिरवणूक.
मुख्य प्रवेशद्वारावरून जाणारे बहुतेक रेल्वे प्रवासी पूकलमचे फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी थांबले आणि सुंदर चेंदमेलम ऐकले, जे पुण्यातील गर्दीसाठी एक वेगळेच होते. पुणे मल्याळी फेडरेशनचे प्रमुख नेते जसे की जॉन टीडी, सरचिटणीस, शानी नौशाद आणिएम व्ही परमेश्वरन, उपाध्यक्ष, राजन आर नायर, कोषाध्यक्ष आणि युवा कल्याण नेते व्ही एम कबीर, आयएनटीयूसीचे राष्ट्रीय सचिव राजन के नायर, एमपीसीसीचे जनरल सेक्रेटरी बाबू नायर हे देखील या उत्सवात उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मल्याळी महिला, मुली आणि पुरुष त्यांच्या पारंपारिक ओणम पोशाखात सहभागी झाले होते.

