मुंबई खाली झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी कोर्ट प्रत्यक्ष जाणार: अवमाननेची कारवाई करण्याचा कोर्टाचा इशारा
3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश
कालच्या याचिकेतील काही गोष्टींकडे कानाडोळा करता येणार नाही. मुंबई खाली झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी कोर्ट आपला प्रतिनिधी पाठवून पडताळून पाहील. विशेषतः गरज पडली तर आम्ही स्वतः तिकडे जाऊन पाहू. कोर्ट या प्रकरणी अवमाननेची कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित 3 याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने ही भूमिका घेतली आहे. कोर्ट आता या प्रकरणी 3 वा. सुनावणी करणार आहे.
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण नोंदवत काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दिलेले नियम डावलण्यात आल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार घेत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “आमची मागणी मान्य केली नाही तर शनिवारी आणि रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येतील आणि मग सोमवारचं आंदोलन छान होईल,” असा सूचक इशारा जरांगे यांनी दिला आहे.मराठ्यांनी रस्ते मोकळे केलेत, पण आझाद मैदान सोडणार नाही. असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांनीजी नोटीस आम्हाला दिली आहे. त्याला आमचे वकील उत्तर देतील. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत, आम्हाला आंदोलन करण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. काल कोर्टाने जे निर्देश दिले, त्याचं आज संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी पालन करताय. सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मनोज दादांनी सांगितल्यानंतर सगळी वाहनं आणि मराठा बांधव हे मुंबईच्या बाहेर जाऊन थांबले आहेत. अशी माहिती ही मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी दिली आहे.
सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोर्टाने आदेश दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच्या गाड्या लगेच हटवल्या आहेत. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. परंतु मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा शासन निर्णय जारी करा. फडणवीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. ते कोर्टाकडे चुकीची माहिती देतात. पण आम्ही आझाद मैदानातून हटणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.मी मेल्यानंतरही तुम्ही शांत रहा, तुम्हाला काय करायचे तुम्ही पाहा- जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, त्यानंतर जे होईल ते तु आणि मराठे पाहून घ्या. सरकार कुठल्याही थराला गेले तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. मराठे काय आहेत हे बघायचे असेल तर मी काही करु शकत नाही. मराठा बांधवांनी शांत रहायचे, मला काहीही झाले तरी शांत रहायचे. मी मेल्यानंतरही तुम्ही शांत रहा. तुम्हाला काय करायचे तुम्ही पाहा. मरेपर्यंत मी मुंबई सोडणार नाही देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतो.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोलिसांना सांगून तुम्ही जर पोरांवर लाठीचार्ज केला तर तो सर्वांत मोठा डाग असेल. तुमच्या लोकांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमच्या नेत्यांना आणि लोकांना राज्यात फिरायचे आहे हे लक्षात ठेवा. शांततेत प्रश्न सोडवा. पोलिसांकडून त्यांचा अपमान होऊ देऊ नका. तसे झाले तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. त्यामुळे गोडीत जे करता येईल ते करा. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडे 9 पट जास्त आहे. जिकडे घुसायचे नाही तिकडे घुसू नका.
“जे कधीही रद्द होणार नाही, पिढ्यान् पिढ्या टिकेल, असं आरक्षण मला माझ्या समाजाला द्यायचं आहे. मी बरोबर करतो, फक्त पोरांना तुम्ही शांत राहा. मला किंवा माझ्या समाजाला डाग लागेल, मान खाली घालावी लागेल, असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, तुम्ही शांत राहा,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.

