पुणे, 1 सप्टेंबर 2025 – भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी भारत-जपान बिझनेस लीडर्स फोरमच्या 12 व्या कार्यक्रमाचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि जपानचे माननीय पंतप्रधान श्री. शिगेरू इशिबा यांच्या उपस्थितीत या फोरमचे आयोजन करण्यात आले होते.
सात वर्षांनी झालेल्या फोरमच्या या बैठकीत हरित ऊर्जा, विद्युत गतिशीलता, अंतराळ तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स, आरोग्यसेवा आणि इलेक्ट्रॉनिक्स यासह द्विपक्षीय सहकार्यासाठी प्रमुख क्षेत्रांवर प्रकाश टाकण्यात आला.
आपल्या भाषणात श्री. कल्याणी यांनी जागतिक आर्थिक सुरक्षितता आणि शाश्वत विकासासाठी भारत-जपान भागीदारीचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर एक लवचिक आणि महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून त्यांनी याचे वर्णन केले. ही भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी श्री. कल्याणी यांनी मध्यम-मुदतीच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर जोर दिला.
भारत आणि जपानच्या पूरक शक्तींचा फायदा घेऊन जागतिक मूल्य साखळींमध्ये अधिक लवचिकता निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बँकिंग, वित्तीय सेवा आणि जागतिक क्षमता केंद्रांच्या स्थापनेत भारतातील वाढत्या जपानी गुंतवणुकीचे त्यांनी स्वागत केले. सोसायटी 5.0 साठी तंत्रज्ञान-चलित, मानव-केंद्रित समाजाच्या स्वप्नासह सह-निर्मिती आणि सह-विकसित उपायांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले. विविध क्षेत्रांमध्ये परस्पर मान्यता करारासाठी संयुक्त मानक-निर्धारण संस्थांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आणि कौशल्य गतिशीलता तसेच मानवी देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. जपानच्या विकसित गरजांना पाठिंबा देण्यासाठी तरुण आणि कुशल कार्यबल प्रदान करण्यासाठी भारतातील वाढत्या लोकसंख्येचा फायदा देखील नोंदवला.
श्री. कल्याणी आणि केइदानरेनचे अध्यक्ष श्री. त्सुत्सुई-सान यांनी एकत्रितपणे दोन्ही पंतप्रधानांसमोर संयुक्त अहवाल सादर केला. या अहवालात भारत-जपान भागीदारीला अधिक भक्कम करण्यासाठी शिफारसी करण्यात आल्या आहेत तसेच संधींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
या संयुक्त निवेदनात शाश्वत विकासासाठी धोरणात्मक स्वायत्तता वाढवणे, सहकार्य मजबूत करणे तसेच द्विपक्षीय आर्थिक संबंधांमध्ये विविधता आणण्यासाठी डिझाइन केलेल्या भविष्यकालीन उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात याचा समावेश आहे:
· व्यापक आर्थिक भागीदारी करारात (CEPA) सुधारणा करणे,
· कर करारात सुधारणा आणि CPTPP मधील भारताच्या संभाव्य प्रवेशाला पाठिंबा देणे;
· आर्थिक सुरक्षेवर भारत-जपान खासगी क्षेत्रात संवाद सुरू करणे;
· स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेद्वारे डीकार्बोनायझेशनचा प्रसार.
· सेमीकंडक्टर, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि एआयमधील सहकार्य मजबूत करणे
· एसएमई आणि स्टार्टअप सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे
· आफ्रिकेसारख्या तिसऱ्या देशांच्या मार्केटमधील भागीदारी वाढवणे आणि प्रतिभा तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे.
· अवकाश क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रयत्न तसेच चित्रपट, ऍनिमेशन, गेमिंग आणि विस्तारित वास्तव (XR) मध्ये सहकार्याच्या क्षमतेवर देखील चर्चा केली.
भारत-जपानमधील आर्थिक भागीदारी नवोपक्रम आणि सामायिक समृद्धीच्या नवीन युगात प्रवेश करत असल्यावर या कार्यक्रमाने शिक्कामोर्तब केले. यामुळे हे दोन्ही देश आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक फायदेशीर मॉडेल तयार होते आहे.

