पुणे- गोयल,मित्तल,अगरवाल,मुलाणी आदींची गुंडागर्दी पुणे पोलिसांनी उघड करून एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .यांनी एकाचे आणि त्याच्या परिवाराचे लोणावळा येथे अपहरण करून 90 कोटीची वाघोलीतील १० एकराचा भूखंड हडपण्यासाठी लुधियानात जागा खरेदीच्या व्यवहाराचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . याप्रकरणी एंफासिस ग्रुपचे भागीदार १) राजेश जयभगवान गोयल २) नवीन जयभगवान गोयल ३) रितेश राजाराम मित्तल ४) निलेश राजाराम अगरवाल ५) किशोर भरत मित्तल ६) रितेश सतिश अगरवाल ७) समीर इमामबक्ष मुलाणी, ८) सोहेल शेख ९) अमराज सय्यद १०) शोएब शेख ११) फिरोज खान १२) उस्मान खान,१३) स्वप्निल उत्तम रांजगे यांच्यावर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ मौजे वाघोली येथील गट नं १२७६ मधील १०एकर जागेचे बनावट दस्ताचे आधारे दोन वेगवेगळे साठेखत नोंदणी केल्याने वाघोली पोलीस ठाणे गु.रं.क. २५७२०२५ व ४००/२०२५ अन्वये गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील आरोपी जॅक्सन जोसेफ दास व रोहित दास यांचे वाघोली पो.स्टे.गु.रं.नं ४००/२०२५ मधील इतर आरोपी यांनी त्यांचे बरोबर जमीनीचा व्यवहार करावा या करिता अपहरण करुन डांबुन ठेवुन मारहाण करुन जीवे मारण्याची भीती दाखविली या बाबी तपासात निष्पन्न झाल्याने वानवडी पो.स्टे.३४९/२०२५ भा. न्या. सं. कलम ११९,१२७ (२),१३८,१४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे .
मौजे वाघोली येथील गट नं १२७६ मधील १० एकर जागेचे बनावट दस्ताचे आधारे दोन वेगवेगळे साठेखत नोदणी केल्याने वाघोली पोलीस ठाणे गु.रं. क. २५७/२०२५ व ४००/२०२५ अन्वये गुन्हे दाखल आहेत. नमुद गुन्ह्यातील आरोपी जॅक्सन जोसेफ दास व रोहित दास यांचे वाघोली पो.स्टे.गु.रं.नं ४००/२०२५ मधील इत्तर आरोपी एंफासिस ग्रुपचे भागीदार १) राजेश जयभगवान गोयल २) नवीन जयभगवान गोयल ३) रितेश राजाराम मित्तल ४) निलेश राजाराम अगरवाल ५) किशोर भरत मित्तल ६) रितेश सतिश अगरवाल ७) समीर इमामबक्ष मुलाणी, ८) सोहेल शेख ९) अमराज सय्यद १०) शोएब शेख ११) फिरोज खान १२) उस्मान खान,१३) स्वप्निल उत्तम रांजगे यांनी वर नमुद जागेची फिर्यादीप्रमाणे बाजारमुल्य ९० कोटी रुपये किंमत असताना सदर जागा अत्यंत कमी किंमतीमध्ये म्हणेजच २४ कोटी रुपयांमध्ये व्यवहार करुन प्रत्यक्षात केवळ २,५०,००,०००/-रु मोबदला देवुन जमीन बळकवण्याच्या उद्देशाने आर्थिक फायद्याकरीता नमुद आरोपीतांनी आपआपसात फौजदारीपात्र कट रचुन जॅक्सन दास यास त्याने व दास परिवाराने आरोपीबरोबर दस्त नोंदणाचा पुढील व्यवहार करावा याकरीता जॅक्सन दास यास लोणावळा येथे नेले व त्याचा मुलगा रोहित दास याला लोणावळा येथे बोलावुन रोहित दास यास डांबुन ठेवुन नोएल दास व त्याचे परिवारास लुधियाणा येथुन दस्त नोंदणीकरीता घेवुन नाही आल्यास रोहित दास यास सोडणार नाही अशी धमकी देवुन जॅक्सन दास यास तात्काळ लुधियाणा येथे जाण्यास भाग पाडले.
तसेच जॅक्सन दास याचे रेसकोर्स पुणे येथुन दि १५/०२/२०२५ रोजी अपहरण करुन त्यास धमकावुन जीवे ठार मारण्याची भिती दाखवुन मारहाण केली त्यामुळे वानवडी पो.स्टे गुर.नं ३४९/२०२५ भा.न्या.सं. कलम ११९,१२७(२),१३८,१४०,६१ (२) अन्वये सोहेल शेख, शोएब शेख, उस्मान खान, अमजद सय्यद, फिरोज खान तसेच एंफासिस ग्रुपचे भागीदार राजेश जयभगवान गोयल, नवीन जयभगवान गोयल, रितेश राजाराम मित्तल, निलेश राजाराम अगरवाल किशोर भरत मित्तल, रितेश सतिश अगरवाल समीर इमामबक्ष मुलाणी, स्वप्निल उत्तम रांजणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे खंडणी विरोधी पथक-१ हे करीत आहे.

