मुंबई–केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन काय केले? त्यांनी केवळ मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे म्हणजे, गुजराती, अमराठी झाला पाहिजे हे भाजपच्या नेत्यांना सांगितले आहे. गृहमंत्री लालबाग च्या राजाकडे जात प्रार्थना करतात की मुंबईचा महापौर हा एक उपरा भाजपचा होऊ देत, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. पण त्यांना मराठा समाजाचे दु:ख विचारण्यासाठी वेळ नव्हता.
संजय राऊत म्हणाले की, भर पावसात मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील अनेक भागात मराठा बांधव आल्याने तो परिसर विस्कळीत झाला आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांच्याबरोबर भाजपचे सर्व लोक उपस्थित होते. इतका गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. तो प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहे. तर आमची अपेक्षा होती देशाचे गृहमंत्री तिथे जातील आणि दिलासा देतील. तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. 370 हटवून काश्मीर प्रश्न जर गृहमंत्री सोडवू शकतात त्यासाठी घटनेत बदल करु शकतात ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घटनेत बदल करु शकतात. 370 कलम हटवण्याचे श्रेय जसे ते घेतात तसेच हे श्रेय त्यांना घेता आले असते. पण त्यांनी ते केले नाही.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मराठी आम्हाला मिळावी ही प्रार्थना करण्यासाठी लालबाग च्या राजाच्या दर्शनाला गेले होते.म्हणून ज्या संख्येने मराठी बांधव मुंबईत जमत आहे त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. आम्हाला त्यांचा काहीच त्रास होत नाही. आम्ही त्यांचे स्वागत करु. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे, की मराठा बांधवांना जी काही मदत शक्य आहे ती आपण करावी. अमित शहांनी जो प्रकार केला तो अत्यंत क्रुर आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे मराठी माणूस नाहीत. ते अमित शहा यांच्या मागे फिरत होते पण त्यांनी मराठा बांधवांसाठी काहीही केले नाही. मराठा बांधवांनी मुंबई आपली आहे हे लक्षात घेऊन मुंबईत मुक्काम केला पाहिजे. आमचा पक्ष त्यांच्या सोबत आहे आम्ही त्यांना सर्व काही सहकार्य करू. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठी माणसांना मारायला निघाले आहे. हे बोलतात एक आणि करतात एक असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याचे सरकार मराठी माणसांना संपवण्यासाठी आलेले आहे. महायुतीतील तिघे एकमेकांना संपवण्याच्या नादात मराठी माणसांना संपवत आहेत. एकनाथ शिंदेंना शहांच्या मागे फिरायला लाज वाटायला हवी होती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊ नका.
संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणाला बसण्याची गरज आहे. पण ही सर्व लोकं भाजपच्या दबावाखाली आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. लोक प्रश्न विचारतील म्हणून शिंदे गावाकडे लपून बसले आहे. त्यांना महत्त्वाच्या क्षणी गावाकडे काय करत आहे.

