टाटा AIA सादर करत आहे आरोग्य एसआयपी — संपत्ती निर्मितीसोबत दीर्घकालीन आरोग्य संरक्षण यांना एकत्र आणणारी एक अद्वितीय आरोग्य विमा योजना
मुंबई, 28 ऑगस्ट 2025 – आरोग्याच्या समस्या काळ वेळ, सवड बघून येत नाहीत. त्या अनपेक्षितपणे उद्भवू शकतात. त्यावेळी कुटुंबियांना मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी किंवा वेळेवर उपचारांसाठी धडपड करावी लागते. भारतात, अनेक व्यक्तींना योग्य मदत योग्य वेळी मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे उपचारात विलंब, खर्चात वाढ आणि अस्वस्थता, तणाव वाढतो.
टाटा AIA लाईफ इन्शुरन्स मध्ये आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की जीवनाचे संरक्षण हे फक्त आर्थिक मदतीपुरते मर्यादित नाही. ते प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आपल्या ग्राहकांसोबत असण्याबद्दल आहे. म्हणूनच आम्हाला “टाटा AIA हेल्थ बडी” सादर करताना अभिमान वाटत आहे. जीवन विमा कंपनीकडून सादर झालेली ही भारतातील पहिली 24×7 आरोग्य आणि स्वास्थ्य सहयोगी योजना असून यात आरोग्य, स्वास्थ्य आणि जीवन विमा यांचा आजवर कधीही झाला नव्हता एवढा अद्वितीय संगम आहे.
हेल्थ बडी ला भेटा: तुमचा विश्वासू वेलनेस सहयोगी
ही नाविन्यपूर्ण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टाटा AIA ने हेल्थ बडी मॅस्कॉट सादर केला आहे. विश्वास, काळजी आणि आपुलकीचे प्रतीक असलेली ही एक मैत्रीपूर्ण आणि सुसंगत ओळख आहे. हा मॅस्कॉट सातत्यपूर्ण आरोग्य सहकार्याची संकल्पना सोपी करतो. त्यामुळे ती कुटुंबांसाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनते.
हेल्थ बडीसोबत, टाटा AIA आपली भूमिका फक्त आर्थिक रक्षक म्हणून नाही तर दैनंदिन स्वास्थ्यामध्ये खरा सहयोगी म्हणून मजबूत करते, ग्राहकांना जीवनातील अनिश्चिततेला तोंड द्यायला तयार ठेवते आणि अधिक निरोगी, आनंदी जीवनशैलीला प्रोत्साहन देते.
आरोग्य आणि वेलनेससह विम्याची पुनर्रचना
टाटा AIA हेल्थ बडी संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी एक व्यापक दृष्टीकोन दर्शवते. वैयक्तिकृत आरोग्य सेवांची जीवन विम्याच्या सुरक्षिततेसोबत जोड देत टाटा AIA हेल्थ बडी ग्राहक आणि त्यांचे प्रियजन केवळ गरजेच्या काळातच नव्हे तर निरोगी जीवन जगण्याच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात सुरक्षित राहतील हे सुनिश्चित करते.
टाटा AIA हेल्थ बडीच्या साथीने हे सादरीकरण पारंपरिक विम्यापलीकडे जाते. हे ग्राहकासोबत विकसित होणारे एक सहायक भागीदारीचे नाते निर्माण करण्याबद्दल आहे. प्रतिबंधात्मक काळजीपासून ते गंभीर आरोग्य व्यवस्थापनापर्यंत, टाटा AIA हेल्थ बडी प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीं सोबत राहण्यासाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे ते निरोगी राहतील आणि जीवनात जे काय वाढून ठेवले आहे त्यासाठी सज्ज राहतील. हे कुटुंबांना एकत्रितपणे निरोगी जीवनशैलीचे फायदे स्वीकारण्यास सक्षम करते. त्यायोगे सर्वांना त्यांच्या स्वास्थ्य प्रवासात सातत्याने आधार मिळतो.
टाटा AIA हेल्थ बडीच्या सादरीकरणाबद्दल बोलताना टाटा AIA चे चीफ ऑफ ऑपरेशन्स संजय अरोरा म्हणाले, “टाटा AIA मध्ये आमचे मुख्य मूल्य हे ग्राहक सेवा असून त्याआधारे प्रत्येक गोष्ट आकाराला येते. टाटा AIA हेल्थ बडी ही जीवन विमा कंपनीकडून भारतातील पहिली 24×7 हेल्थ आणि वेलनेस सहकार्य योजना सादर करत असताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आरोग्य, स्वास्थ्य आणि जीवन विमा यांचा अनोखा मिलाफ करून आम्ही ग्राहकसेवेत एक नवा मापदंड निश्चित करत आहोत. टाटा AIA हेल्थ बडी आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या उपाय सुविधांची उपलब्धता देत असून त्यामुळे केवळ त्यांचे आरोग्य संरक्षण होत नाही तर त्यांना अधिक निरोगी, समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करतात. आम्ही त्यांच्या आरोग्य आणि स्वास्थ्य प्रवासात खरे भागीदार आहोत आणि त्यांना आत्मविश्वास व आर्थिक सुरक्षिततेसह खऱ्या अर्थाने हर वक्त के लिए तय्यार (कोणत्याही प्रसंगासाठी तयार) ठेवतो. ही सेवा म्हणजे आमच्या या बांधिलकीची पावती आहे.”
हेल्थ बडीमध्ये काय काय आहे?
फक्त टाटा AIA लाईफ इन्शुरन्स अॅप वर उपलब्ध असून हेल्थ बडी विविध सेवा देते. यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
· प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या (थायरॉईड, HbA1C, अॅनिमिया, पीसीओएस चाचण्या इ.)
· गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच HPV, हीपेटायटीस यांसारखी इतर शिफारस केलेल्या लसी
· महिला वैद्यकीय सेवा : पीसीओडी, आयव्हीएफ, रजोनिवृत्ती (मेनोपॉज), वंध्यत्व इत्यादीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांशी प्रत्यक्ष सल्लामसलत
· दंत आरोग्य : दंतचिकित्सकांशी प्रत्यक्ष सल्लामसलत
· 24 हून अधिक म्हणजेच पेडिअॅट्रिक्स पासून डर्माटोलॉजी, न्यूरोलॉजी, यूरोलॉजी आणि इतर स्पेशॅलिटींमध्ये डॉक्टर सल्लामसलत
· लॅब चाचण्या आणि औषध ऑर्डर्सवर सवलती
· गंभीर आजाराचे निदान झालेल्या प्रकरणांत वैद्यकीय सेकंड ओपिनियन आणि समर्पित केस सपोर्ट
· वैयक्तिक आरोग्य उद्दिष्टांनुसार डिझाइन केलेली फिटनेस आणि आहारतज्ञाची सल्लासत्रे
हेल्थ बडीवर आधारित टाटा AIA हेल्थ एसआयपीचे सादरीकरण
हेल्थ बडीला पूरक आणि सर्वांगीण स्वास्थ्याबाबतच्या आमच्या बांधिलकीस बळकट करण्यासाठी टाटा AIA कंपनी टाटा AIA हेल्थ एसआयपी हीएक नाविन्यपूर्ण नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट-लिंक्ड आरोग्य विमा योजना सादर करत आहे.
हेल्थ बडी काळजी आणि सहाय्यावर लक्ष केंद्रित करत असताना हेल्थ एसआयपी दीर्घकालीन आर्थिक तयारीची ताकद आणि जोड देत आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आरोग्य संरक्षणाला संपत्ती निर्मितीसोबत जोडते. त्यामुळे ग्राहकांना आणीबाणीच्या वेळी संरक्षण मिळते आणि त्याचबरोबर भविष्यासाठी सुरक्षितता मिळते.
कोणतेही प्रीमियम अलोकेशन चार्जेस नसल्याने आणि फंड व्हॅल्यू वाढवण्यासाठी अतिरिक्त मॅच्युरिटी बूस्टर्समुळे, हेल्थ एसआयपी वाढीसह संरक्षण देते. योजनेच्या 6व्या वर्षापासून यात ग्राहकांना आरोग्यसंबंधित खर्चासाठी टॅक्स-फ्री विड्रॉवल्स करण्याची परवानगी देते. त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी आर्थिक लवचिकता मिळते. तसेच हे दीर्घकालीन गंभीर आजारांसाठी संरक्षण देते. यात 30 वर्षांसाठी प्रीमियम फिक्स करण्याची क्षमता आहे.
ग्राहकांच्या विविध गरजांसाठी, हेल्थ एसआयपी दोन प्रकारात येते:
· हेल्थ एसआयपी प्लस : यात अंगभूत ॲक्सिडेंटल टोटल अॅण्ड पर्मनंट डिसॅबिलिटी (ATPD) लाभ समाविष्ट आहेत.
· हेल्थ एसआयपी प्लस प्रो: ATPD लाभांसोबत टर्मिनल इलनेस विथ टर्म बूस्टर (TTB) संरक्षण सुध्दा समाविष्ट आहे. त्यामुळे अतिरिक्त संरक्षण मिळते.
विम्याचे भविष्य म्हणजे आरोग्य आणि स्वास्थ्य प्रथम
टाटा AIA हेल्थ बडी आणि टाटा AIA हेल्थ एसआयपी सारखी उत्पादने सादर करून कंपनी जीवन विम्याची नवी व्याख्या करत आहे. हे फक्त कठीण काळात संरक्षण देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर हे कुटुंबांना प्रत्येक दिवशी अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करण्याबद्दल आहे.
तुमच्या आरोग्यास आता एक नवा साथीदार मिळाला आहे जो नेहमी तुमच्या सोबत, नेहमी मदतीस तयार आहे.
टाटा AIA हेल्थ बडी सेवा टाटा AIA च्या टाटा AIA पीआर लाईफ प्रो +, टाटा AIA पीआर लाईफ प्रो, टाटा AIA पीआर लाईफ मॅक्सिमा +, टाटा AIA पीआर लाईफ अॅडव्हांटेज +, टाटा AIA पीआर लाईफ ग्रोथ +, टाटा AIA पीआर लाईफ प्रो अॅडव्हान्स, टाटा AIA स्मार्ट संपूर्ण रक्षा फ्लेक्सी, टाटा AIA पीआर 2.0, टाटा AIA प्रीमियर एसआयपी, टाटा AIA सुपर एसआयपी, टाटा AIA स्मार्ट एसआयपी 360, टाटा AIA स्मार्ट संपूर्ण रक्षा +, टाटा AIA प्रीमियर पेन्शन सिक्युअर, टाटा AIA प्रो-फिट, टाटा AIA शुभ शक्ती, टाटा AIA शुभ शक्ती सिलेक्ट, टाटा AIA शुभ रक्षक आणि टाटा AIA शुभ रक्षक सिलेक्ट या विविध योजना सुविधांसोबत उपलब्ध आहे.

