१९१० नंतरचा सर्वाधिक पाऊस,जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस-
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी जम्मू – कटरा येथून ये-जा करणाऱ्या ५८ गाड्या रद्द केल्या तर ६४ गाड्या मध्यावर थांबवण्यात आल्या. बुधवारी पाऊस थांबल्यानंतर मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. मुसळधार पावसामुळे अनंतनाग व श्रीनगरमधील झेलमने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी निवासी भागात घुसले. प्रमुख पूल व व्यावसायिक प्रतिष्ठानांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. किश्तवारमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे डोंगराळ भागात पूर आला. अनेक घरे, वाहने व दुकाने वाहून गेली. ढिगाऱ्यात व पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. २२ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर दूरसंचार सेवा अंशतः पूर्ववत करण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातही रात्रभर मुसळधार पाऊस पडला. जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागातून १०,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हवामान विभागाने सांगितले – जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस पडला. तो १९१० नंतरचा सर्वाधिक आहे. मंगळवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून २४ तासांत पाऊस पडला. उधमपूरमध्येही विक्रमी ६२९.४ मिमी पाऊस पडला. जुलै २०१९ मध्ये उधमपूरमध्ये ३४२ मिमी व ऑगस्ट १९७३ मध्ये जम्मूत २७२.६ मिमी पाऊस पडला.
न्यायाधीश बोटीने पोहोचले..अनंतनाग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हा न्यायालय परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. असे असूनही मुख्य जिल्हा न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना बोटीने न्यायालयात पोहोचले. न्यायालय, कार्यालय व अभिलेखागार पाण्यात बुडाले होते. न्यायाधीश म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही न्याय थांबवता येत नाही… आपल्याला आव्हान स्वीकारावे लागेल. पूर न्यायालयाला बुडू शकतो. परंतु न्यायाला बुडू देऊ नये. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी फिरोज अहमद खान देखील त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे परिस्थिती बिकट झाल्यावर, एसडीआरएफने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकीलांना व लोकांना बाहेर काढले.
लावैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवली, नातेवाइकांचा शोध सुरू..मंगळवारी, कटरा ते वैष्णोदेवी यात्रा मार्गादरम्यान अर्धकुनारीजवळ भूस्खलनात २० जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैष्णोदेवीकडील दोन मार्गांपैकी बुधवारी सकाळी हिमकोटी मार्गावरील यात्रा थांबवली होती. पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवली.
भारतीय हवाई दलाचे C-130 वाहतूक विमान बुधवारी जम्मूमध्ये पोहोचले, ते यात्रा मार्गावरील लोकांसाठी मदत – बचाव साहित्य घेऊन गेले.
माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अपघातानंतर, कटरा बेस कॅम्पमध्ये अस्वस्थता होती. तिथेच प्रियजनांच्या शोधात भटकणारे व्यथित नातेवाईक आहेत. शुभम साहू जबलपूरहून ११ जणांसह आला होता. परतताना रस्ता खचला. त्याचे तीन मित्र बेपत्ता आहेत.
पंजाबमधील सुभाष देखील चार साथीदारांचा शोध घेत रुग्णालय आणि मदत केंद्राच्या फेऱ्या मारत आहे. आतापर्यंत २० मृतांची ओळख पटली आहे,
यात्रा थांबवल्यानंतर कटरा येथे राहिलेल्या भाविकांत परतायचे की थांबायचे याबद्दल गोंधळ आहे. दिल्लीतील नैना म्हणाल्या, हेलिकॉप्टर तिकिटे बुक केली होती. परंतु सतत पाऊस, गाड्या थांबल्यामुळे सर्वकाही ठप्प आहे.
यात्रा का थांबवली नाही–जम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आश्चर्य व्यक्त करून हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही वैष्णोदेवी यात्रा थांबवली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यात्रेकरूंना का हलवले नाही? नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुर्घटना ढगफुटीने घडली. यात्रा थांबवली. पीडितांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जाहीर केले.

