पुणे :सहा लाखाचा चेक बाउन्स झाल्याने न्याय दंडाधिकारी पुणे जिल्हा न्यायालयाने (जेएमएफसी कोर्ट) इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा व फिर्यादी पॅकेरा कंपनीस बारा लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश 20 ऑगस्ट रोजी दिला आहे. पुण्याच्या अतिरिक्त न्यायदंडाधिकारी रेवती देशपांडे यांच्या कोर्टाने चेक बाउन्स बद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय देत इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील डेअरी प्रोजेक्ट क्षेत्रातील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना शिक्षा सुनावली आहे.
वारजे पुणे येथील इंडोटेक कंपनीने पुण्यातील पॅकेरा कंपनीस सतरा जानेवारी २०१५ रोजीचा सहा लाख तीनशे रुपयाचा चेक दूध पॅकिंग मशीनच्या खरेदीपोटी दिला होता. परंतु हा चेक भरला असता आयसीआयसीआय बँकेमध्ये हा खाते बंद असल्यामुळे न वटता परत गेला. त्यामुळे फिर्यादी पॅकेरा कंपनी चे मुकुंद किर्दत यांनी रीतसर नोटीस दिल्यावरही इंडोटेक कंपनीने पेमेंट न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात पुणे कोर्टामध्ये केस दाखल केली होती. तब्बल दहा वर्षांपूर्वी दूध पिशव्या पॅकिंग मशीन दिल्यानंतर त्याच्या पोटी दिलेला उर्वरित रकमेचा चेक बाउन्स झाल्याबद्दल दुप्पट रकमेचा दंड भरपाई पोटी भरावा लागण्याची वेळ आली आहे. व तक्रारदारास मानसिक त्रास आणि कोर्ट कचेरी खर्च या सगळ्यामुळे तब्बल चार महिन्याचा तुरुंगवास ठोठावला आहे. आरोपी जंजिरे हे व्यवस्थापकीय संचालक असल्यामुळे, व सर्व व्यवहार त्यांच्याशी झाल्यामुळे, आरोपी कंपनीच्या कारभारास तोच जबाबदार असतो असा निष्कर्ष काढत भारतीय दंड संहिता निगोटियबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 अन्वये ही शिक्षा सुनावली आहे.
दोषी भाऊसाहेब जंजिरे व त्यांची कंपनी इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर चेक न वटण्यामुळे अनेक जणांची खटले दाखल केलेले आहेत. त्यामुळे अनेक सहकारी दूध संस्था व मशिनरी उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा खटल्यामध्ये न्यायालयात न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे छोट्या व्यावसायिकांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान होते अशी खंत फिर्यादी मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली.
Mukund Kirdat, Proprietor PACKERA
ORDER ON COURT WEBSITE . LINK: https://pune.dcourts.gov.in/wp-admin/admin-ajax.php?es_ajax_request=1&action=get_order_pdf&input_strings=eyJjaW5vIjoiTUhQVTA0MDM0MDEzMjAxNSIsIm9yZGVyX25vIjoyLCJvcmRlcl9kYXRlIjoiMjAyNS0wOC0yMCJ9




