पुणे दि.25 :- गणेश उत्सव काळात नागरिकांना स्वच्छ, निर्भळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे मार्फत उत्सव काळात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात 11 ऑगस्ट 2025 रोजी पासुन आज पर्यंत एकुण 35 अन्न आस्थापनेच्या तपासण्या करण्यात आल्या असुन अन्न आस्थापनेतून सणासुदीच्या काळात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ व मिठाई यांचे एकुण 62 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी कळविले आहे.
गणेश उत्सव व येणा-या सणासुदीच्या काळात अशी धडक कारवाई चालु राहणार आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन, म. राज्य पुणे कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी व सहायक आयुक्त (अन्न) यांचे मार्फत सह आयुक्त (पुणे विभाग) अन्न व औषध प्रशासन, म. राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणा-या अन्न पदार्थामध्ये भेसळीबाबत काही संशय असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाचा 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन सह आयुक्त (अन्न) (पुणे विभाग) अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000
गणेश उत्सव व सणासुदीच्या काळात अन्न व औषधप्रशासना मार्फत विशेष तपासणी मोहिम
Date:

