हे डिजिटल बुटिक २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू होईल; यात सब्यसाची कलकत्ताकडील १८ कॅरेट सोन्यात घडवलेला, व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, नैसर्गिक मोती, मौल्यवान रत्ने आणि ब्रँडच्या खास कारागिरी यांनी सजलेला फाइन ज्वेलरीचा निवडक संग्रह सादर केला जाईल.
पुणे : टाटा क्लिक लक्झरी या भारतातील लक्झरी लाइफस्टाइलच्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मने देशातील पहिले डिजिटल ज्वेलरी बुटिक सुरू करण्यासाठी सब्यसाची कलकत्ता या भारतातील प्रमुख लक्झरी ब्रँडशी विशेष भागीदारी जाहीर केली आहे. परंपरेची सांगड आणि डिजिटल नवकल्पना यांचा अनोखा संगम या भागीदारीत असेल. त्यामुळे सब्यसाचीचे अप्रतिम कारागिरीचे नमुने अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या चिरंतन लक्झरीच्या वारशाला साजेसे राहतील.
हे बुटिक २१ ऑगस्ट २०२५पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे . सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचा सर्वांत मोठा संग्रह यामध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल. १८ कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेल्या या संग्रहात कोलकात्याच्या सुप्रसिद्ध अटेलिअरमधून आलेल्या विविध फाइन ज्वेलरी कलेक्शन्सचा समावेश आहे.
यातील रॉयल बंगाल हेरिटेज गोल्ड कलेक्शनमध्ये शुद्ध सोन्यात कोरलेले बंगाली वाघाचे प्रतीकचिन्ह आणि पारंपरिक सब्यसाची मंगळसूत्र यांचा समावेश आहे. रॉयल बंगाल डायमंड कलेक्शनमध्ये व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, मौल्यवान रत्ने आणि नैसर्गिक स्टोन चार्म्स जडवले आहेत. रॉयल बंगाल पर्ल सीरीजमध्ये नैसर्गिक, कल्चर्ड आणि‘साउथ सी मोत्यांचा समावेश आहे. सुंदरबन कलेक्शन या संग्रहात इतिहासात डोकावणाऱ्या प्राचीन हस्तकलेचे ज्ञान फुलाफळांच्या रूपात खुलणारे आहे. टायगर स्ट्राईप आणि शालिमार कलेक्शन्स ही १८ कॅरेट सोन्यात लॅकरची कलात्मक झाक देऊन तयार करण्यात आलेली आधुनिक प्रतीके आहेत. टायगर आय गटात हिरेजडित बंगाली वाघाचे प्रतीक आहे. इतर उत्पादनांच्या यादीत इअरिंग्स, लॉकेट्स, ब्रेसलेट्स आणि अंगठ्या आहेत. हे सर्व दागिने दैनंदिन वापरातील सौंदर्य लक्षात घेऊन घडवलेले आहेत.
एखाद्या खास प्रसंगासाठीची खरेदी असो, वैयक्तिक स्टाईलसाठी असो किंवा मनापासून द्यावयाच्या भेटीसाठी असो, टाटा क्लिक लक्झरीच्या ग्राहकांना सब्यसाचीच्या या विविध उत्पादनांच्या खरेदीचा खास वैयक्तिक अनुभव जाणकार तज्ज्ञांच्या मदतीने घेता येईल.
सब्यसाचीच्या सादरीकरणाविषयी बोलताना टाटा क्लिक लक्झरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल आस्थाना म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीमध्ये आम्ही भारतीय, तसेच जागतिक लक्झरीचा उत्सव साजरा करतो. जगातील सर्वोत्तम लक्झरी ब्रँड्सची जपून निवड करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला आणखी बळकटी देणारे हे सब्यसाचीचे सादरीकरण आहे. अप्रतिम कारागिरीसाठी आणि भारतीय परंपरेशी घट्ट नात्यासाठी सब्यसाची प्रसिद्ध आहे. हा ब्रॅंड पारंपरिक सौंदर्यशास्त्र आणि जागतिक आकर्षण यांचा अनोखा संगम सादर करतो. सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचे आमच्या प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत असल्यामुळे आमच्या लक्झरी ज्वेलरी संग्रहाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे. देशातील टियर-२ व टियर-३ शहरांतील कलासक्त ग्राहकांसह संपूर्ण भारतात हा प्रतिष्ठित ब्रँड आम्ही पोहोचवीत आहोत. भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म आणि देशातील सर्वाधिक गौरवशाली डिझायनर या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळे डिजिटल युगातील फाइन ज्वेलरी अनुभवाची नवी व्याख्या या विशेष भागीदारीतून परिभाषित होत आहे.”
सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे संस्थापक व क्रिएटिव्ह डायरेक्टर सब्यसाची मुखर्जी म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर सब्यसाची फाइन ज्वेलरी सादर करताना मला अभिमान वाटतो. ज्यामुळे आमचा ब्रँड सदैव लोकांच्या मनात घर करून आहे, त्याच गाभ्याने, तेवढ्याच चिरंतन उच्च मानकांनी आणि तेवढ्याच विलक्षण मूल्यदृष्टीने हा संग्रह साकारला आहे. आमची किंमत स्वप्नवत नाही, तर वास्तवाशी जोडलेली आहे. सुसंस्कृत, परंपरांशी निगडित आणि चिरंतन ही मूल्ये ग्राहकांना ‘सब्यसाची हाऊस’कडून अपेक्षित असतात, ती सर्व या कलेक्शनमध्ये समाविष्ट आहेत. भारतात आपण किंमतींबद्दल बरेच बोलतो, पण मूल्याबद्दल फारसे बोलत नाही. तुम्ही लोकांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टता देता, तेव्हा त्यांना त्यातील फरक जाणवतो, हा माझा विश्वास आहे.”
‘सब्यसाची कलकत्ता एलएलपी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष चोप्रा म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर आमच्या फाइन ज्वेलरी लाईनचे पदार्पण होणे हा सब्यसाचीसाठी एक नवा रोमांचक अध्याय आहे. दोन दशकांहून अधिक काळ हा ब्रँड आपल्या प्रामाणिकतेसाठी, कारागिरीसाठी आणि शाश्वत मूल्यांसाठी ओळखला जातो. आता आमची ज्वेलरी ऑनलाइन लक्झरी रिटेलच्या जगात आणून आम्ही आमचे अटेलिअर्स आणि देशभरातील घरे यांच्यातील अंतर मिटवत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला सब्यसाचीच्या मूल्यांचा अनुभव घेता येईल आणि ती मूल्ये आत्मसात करता येतील. अप्रतिम गुणवत्ता असलेली आमची फाइन ज्वेलरी आणि विचारपूर्वक ठरवलेल्या त्यांच्या किंमती, असा हा लक्झरीच्या जगात दुर्मिळ असलेला सुंदर मिलाफ आहे. टाटा क्लिक लक्झरीचे नवे दार उघडताना, आमची ज्वेलरी नवीन घरांमध्ये पोहोचेल आणि देशभरात नव्या कथांनी फुलेल, हे पाहण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे.”
सब्यसाचीच्या प्रतिष्ठित फाइन ज्वेलरीचे कलेक्शन २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरीवर उपलब्ध आहे .

