पुणे : भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी झाला. महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ,पर्वती) येथे झालेल्या अधिवेशनात देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते.दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देशातील १२ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग होता.ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी या प्रसंगी केले.२२ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचा दुसरा दिवस विविध ज्योतिष विषयक सत्रांनी गाजला.या सत्राचे उद्घाटन डॉ.सुनीता पागे,डॉ.सीमा देशमुख,मोहन दाते,सिद्धेश्वर मारटकर,मोहन फडके,शुभंगिनी पांगारकर,मधुसूदन घाणेकर,शशिकांत ओक,नितीन गोठी,चारुशीला कांबळे,सोपान बुडबाडकर आणि जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत झाले.या दिवशी कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.जयश्री बेलसरे यांना,सौ. पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार तर चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री नाटेकर हे अध्यक्षस्थानी होते.आयोजक चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पा शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.सौ.गौरी केंजळे आणि सौ.अर्चना जोगदेव यांनी सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय समारोप करताना,श्री नाटेकर म्हणाले,’ज्योतिष हे उपयुक्त माध्यम असून त्यातून सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे.समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे.ज्योतिषांनी आधुनिक माध्यमे वापरावीत,त्यातून प्रभाव निर्माण करावा.अधिवेशनातील विषयात वैविध्य आणले पाहिजे.४३ वर्षे हे अधिवेशन होत आहे,ही अतुलनीय गोष्ट आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात सुख,समाधान,भरभराट यावी,यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे.
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुण हुपरीकर आणि डॉ.नीलेश कुलकर्णी होतेपहिल्या दिवशी २१ ऑगस्ट रोजी उदघाटन सोहळा उल्हास पाटकर,विजय जकातदार,अविनाश मग्गीरवार,राज कुंवर, नवनीत मानधनी,चंद्रकला जोशी,रोहित वर्मा,नवीनभाई शहा,व.दा.भट,उमेश कुलकर्णी व कैलास केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी उल्हास पाटकर यांचा अमृतमहोत्सव निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला.तसेच विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार आणि रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आले.सौ.गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योतिषविषयक पुस्तकांचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.

