पुणे- आज येथे पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली असून त्यानुसार आता मानाच्या पाचही गणपती मंडळांना जनभावना लक्षात घेऊन नेहमीप्रमाणे उशीर न करता सकाळी लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावं लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने काल मागे घेतला, या दोन्ही मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे सायंकाळनंतर सुरू होईल, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कालच जाहीर केले होते .त्यानंतर विसर्जन मिरवणूक वेळेत म्हणजे विसर्जन दिवशीच पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची भावना असते पण मानाची ५ गणपती मंडळे उशिरा मिरवणुकीत सहभागी होतात आणि पूर्ण दिवस लक्ष्मी रस्त्यावर घालवितात अशी अनेकांची तक्रार होती त्यामुळे काही मंडळांनी तुम्ही ७ वाजता सकाळी मिरवणुकीला प्रारंभ करा अन्यथा आम्ही मिरवणूक सुरु करू अशीही भूमिका ६० मंडळांनी घेतली आणि विसर्जन मिरवणुकीत कोणी कधी सहभागी व्हायचे यावरून चर्चा सुरु झाली . या मुद्द्यावर पोलीस आयुक्त यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलून नियमावली केल्याचे वृत्त आहे या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर सविस्तर पणे माहिती पोलीस आयुक्त देतील अशी अपेक्षा आहे .
अजित पवार म्हणाले कि, काही मंडळांनी परस्पर आपण मिरवणुकीत कधी सहभागी होणार हे जाहीर केले होते ,काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते मला भेटले आम्हाला सकाळी ७ वाजता निघू द्या म्हणाले,त्या सगळ्या मंडळाशी बोलून मतभेद राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू, मानाचे गणपती यांचा मान ठेऊन त्जेयांना वढं सकाळी लवकर विसर्जनासाठी काढता येईल तेवढा प्रयत्न करू या शिवाय किती ढोल ताशा पथक संख्या हवी, मानाचे गणपती यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होत आहे गणेशोत्सव महायुतीच्या राज्य महोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.अधिक उत्साहात यंदा गणेशोत्सव होईल, राज्यातील सगळी यंत्रणा झोकून काम करणार आहे.सकाळी ६ ते रात्री २ मेट्रो सुरू राहील, शेवटच्या दिवशी सगळा दिवस चालू राहील. गणपती पाहण्यासाठी कुठल्या स्टेशनला कुठे चढावे आणि उतरावे याबाबत सुद्धा नियोजन करणार आहोत.पुणे ग्रँड चॅलेंज टूर मध्ये दोन्ही पालिका, जिल्हा परिषद, अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचे काम होणार आहे तसेच आज लोगो तयार केला आहे.

