सातारा -जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडमधील तांबवे येथील पुलाच्या दुर्दशेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवार-पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिपूजन केल्याने पुलाची दुर्दशा झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.शिवाय अजितदादांना पाणी दाखवायला हवं असेही ते म्हणालेत .
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी कराडमधील तांबवे येथील पुलाची पाहणी करताना त्यांना पुलाची दुर्दशा दिसली. स्थानिक नागरिकांनी पुलाची उंची कमी झाल्याचे कारण देत अजित पवार यांच्यामुळे हे घडल्याचे सांगितले. त्यावर देसाई म्हणाले की, तांबवे पुलाचे भूमिपूजन एकदा अजित पवार यांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे ही दुर्दशा झाली आहे. अजित पवारांना पाणी दाखवायला हवे होते.शंभूराज देसाई म्हणाले की, तांबवे पुलाचे भूमिपूजन एकदा अजित पवार आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे ही दुर्दशा झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे पुलाची उंची कमी झाल्याचे लोकांनी सांगताच शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना पाणी दाखवले पाहिजे असे म्हटले आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून आता अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शंभूराज देसाई म्हणाले की, तांबवे येथील पूल अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोयना धरणातून विसर्ग वाढल्यानंतर कराड शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होते व काही घरे पाण्याखाली जातात. त्या घरांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नगरपालिकेने जागा शोधावी. त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली जातील. यासाठी सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी पाटील यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले की, सध्या पाऊस ओसरला असला तरी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अलर्ट राहावे. ओढे-नाले ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्यास विशेष खबरदारी घ्यावी. पाणी वाढल्यामुळे शाळेला सुट्टी द्यावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. दरड कोसळून कुठेही वाहतूक व्यवस्था बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.

