पालघर- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, पालघरचे माजी नगराध्यक्ष व शरद पवार गटाचे नेते नंदकुमार पाटील, त्यांच्या पत्नी रेश्मा पाटील यांनी अनेक समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, बाबाजी कारोळ, विवेक कलमाडा आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, उबाठा गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 10 माजी जिल्हा परिषद सदस्य, 52 सरपंच आणि उपसरपंच, 123 ग्राम पंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली वेगाने विकासकार्ये सुरू आहेत. विकासाच्या राजकारणाला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांचा विश्वास अबाधित ठेवू.
पालघर जिल्ह्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी मंत्री शंकर नम यांचे पुत्र सुधीर नम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार राजाराम ओझरे यांचे पुत्र सुधीर ओझरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिका निकम, शिरगावचे जि. प. सदस्य घनश्याम मोरे, सरपंच पौर्णिमा धोडी, सरावली चे सरपंच आनंद धोडी, जव्हारचे माजी सभापती चंद्रकांत रंधा, माजी युवासेना प्रमुख रिकी रत्नाकर, संघटक प्रकाश सांबर यांचा समावेश आहे.👆
पालघर जि. प. माजी अध्यक्ष प्रकाश निकम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश
Date:

