विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त माजी राज्यसभा सदस्य सुनील शास्त्री यांचे विचार
पुणे” मानवतेचा प्रचार करायचा असेल तर मानवता अंगीकारणे सर्वात महत्वाचे आहे. जर मानवता नसेल तर जागतिक शांती कशी येईल. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती शांती विसरला आहे. अशा वेळी जयपूरमध्ये भारतरत्न लाल बहाद्दू शास्त्री यांच्या नावाने विश्वधर्म संग्रहालय बांधून जागतिक शांतीचा नारा दिला जाईल.” असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
माइर्स एमआयटी ने सुरू केलेल्या विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी अॅड गुरू भारत दाभोळकर आणि श्रीमती शास्त्री सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच विश्वशांती दर्शन वाहिनीचे सीईओ डॉ. मुकेश शर्मा आणि प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
सुनील शास्त्री म्हणाले,” जय जवान, जय किसान हा नारा देणारे भारतरत्न लाला बहादूर शास्त्री यांनी नेहमीच देशाच्या कल्याणाचा विचार केला. या नार्यामुळे संपूर्ण देश एक झाला. त्याच मार्गावर चालत डॉ. विश्वनाथ कराड यांनी जागतिक शांती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. ते विश्वशांती दर्शन वाहिनीद्वारे शांतीचा संदेश पसरवत आहेत आणि सर्वांच्या मनात शांतीचे बीज पेरत आहेत.”
” विद्यार्थी जीवनाची गोष्ट सांगतांना सुनील शास्त्री म्हणाले की, माझ्या बालपणी माझे वडील लाल बहादूर शास्त्री यांना २१ दिवस भेटू शकलो नाही. त्यानंतर मला राग आला आणि मी माझ्या वडिलांशी तो विषय बोललो. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी उत्तर दिले की, बेटा येथील लोकांनी मला देशातील सर्वोच्च पदावर बसवले आहे. म्हणून भारत देश हा माझे संपूर्ण कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकलो नाही. डॉ. कराड देखील या जागतिक विचारसरणीवर विश्वास ठेवणार्या शास्त्रीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत.”
आपल्या स्वागत पर भाषणात डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, या वाहिनीचा पाया वसुधैव कुटुंब कमच्या विचासरणीवर आणि जागतिक शांतीच्या तत्वावर रचला गेला आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला शांती कशी मिळू शकते या विषयावर सतत प्रसारण केले जात आहे. त्यानंतर भारत दाभोळकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.
येथे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित लघु चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थीनी संज्ञा उपाध्ये हिने आपल्या सुरेल आवाजात सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मने जिंकली. डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.
जागतिक शांततेसाठी मानवता सर्वात महत्वाची
Date:

