पुणे- सोळावी स्वर्गीय राजीव गांधी स्मृती जिल्हा टेनिक्वाईट स्पर्धा महाराष्ट्रीयन मंडळ टिळक रोड येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट दरम्यान संपन्न झाली .स्पर्धा सब ज्युनिअर( 14 वर्षाखालील) मुले मुली ज्युनियर (18 वर्षाखालील) मुले मुली व खुला गट पुरुष व महिला अशा तीन गटात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटांमध्ये प्रथमेश ढवळे यांनी प्रणव पाटील वर 1921 21 21 18 21 11 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर साहिल खेडेकर यांनी आदित्य मेस्त्री 18 21 19 21 13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीमध्ये प्रथमेश ढवळे यांनी साहिल खेडेकर यांचा 19 21 ,21 17 ,21 16 असाच असे चुरशीच्या सामन्यात पराभव करून सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये कस्तुरी बाजारे हिने वैष्णवी ठिगळे हिचा 21 11, 21 9 असा सरळ पराभव करून अंतिम फेरी गाठली दुसऱ्या सामन्यात प्राप्ती बालवडकर तिने वैष्णवी रिठे हिचा 21 8, 21 5 असा पराभव केला करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर कस्तुरी बाजरे येणे वैष्णवी ठिगळे हिचा 21 13 21 9 असा पराभव करून अंतिम फेरी गाठले अंतिम फेरीत कस्तुरी बाजरेने प्राप्ती बालवडकर हिचा 21 16 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत कस्तुरी बाजरेने प्राप्ती बालवडकर तिचा २१ १८ २१. १२ असा सरळ पराभव करून विजेतेपद पटकावले कस्तुरी बाजरेने जूनियर 18 वर्षाखालील गटातही विजेतेपद मिळवला आहे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
अर्णव लोणारी विजय विरुद्ध जावेद आतार 21 19 21 18
14 वर्षाखालील मुली
अंतिम फेरी जानवी टिळेकर विजय विरुद्ध धनश्री भोईटे 21 13 21 16
18 वर्षाखालील मुले अंतिम फेरी
मयूर शेलार विजयविरुद्ध विराज मोरे 21 19 22 20
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
14 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक जानवी टिळेकर उरळीकांचन
द्वितीय क्रमांक धनश्री भोईटे उरळी कांचन
14 वर्षाखालील मुले
प्रथम क्रमांक मयूर शेलार उरळीकांचन
द्वितीय क्रमांक विराज मोरे गरवारे कॉलेज
17 वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक जानवी बाजरे मॉडर्न कॉलेज
द्वितीय क्रमांक प्राप्ती बालवडकर भारती विद्यापीठ बालेवाडी
खुला गट पुरुष
प्रथम क्रमांक प्रथमेश ढवळे उरळी कांचन
द्वितीय क्रमांक साहिल खेडेकर उरळी कांचन
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पिंपळे होते. प्रास्ताविक अनिल वरपे सचिव यांनी केले. चेतन अग्रवाल सहसचिव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आपल्या भाषणांमध्ये अविनाश बागवे यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व व त्यासाठी पुणे महानगरपालिका क्रीडा समिती अध्यक्ष असताना केलेल्या कामाची माहिती देऊन संघटनेस रिंग टेनिस या खेळासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . या स्पर्धेत सलोनी फाऊंडेशन तर्फे रेखा ऐतवडेकर यांनी उत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षिसे दिली.स्पर्धा डॉ.विकास आबनावे फाऊंडेशन यांनी पुरस्कृत केली होती.आभार प्रदर्शन स्मिता गांगुर्डे यांनी तर सूत्रसंचालन सौ रुपाली पवार यांनी केले

