पुणे, दि. 21 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव या कार्यालयाच्या अधिनस्त आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, हडपसर, पुणे करिता 300 ते 500 विद्यार्थी निवासी राहु शकतील अशी सर्व सोयी-सुविधायुक्त शासकीय किंवा खाजगी इमारत भाडेतत्वावर शासकीय दराने घ्यावयाची आहे. वसतीगृहाची इमारत शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन या परीसरात असणे आवश्यक आहे.
इमारत भाड्याने देण्याकरिता इच्छुकांनी परीपूर्ण कागदपत्रांच्या छांयाकित प्रती आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, अतुल टकले नगर, लाईन नं. २, गोपाळपट्टी मांजरी, हडपसर, पुणे येथे सादर करावीत. तसेच अधिक माहितीसाठी गृहपाल अर्चना पवार (मो.नं. 9921403882) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय वसतीगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर मिळणेबाबत आवाहन
Date:

